अलास्का अमेरिकेला विकणे ही इतिहासातली रशियाने केलेली घोडचूक 

307

चीन अमेरिका व्यापार युद्ध चालू होण्याच्या आधी अमेरिका आणि रशिया मध्ये कायम कुरबुरी चालत असत. तेव्हा सोवियेत रशिया हा खूप मोठा  १९२२ साली सोवियत रशियाची निर्मिती झाल्यानंतर हे दोन्ही देश १९४१ सालातले दुसरे विश्वयुद्ध गळ्यात गेले घालून लढले आणि हिटलर विरुद्ध जिंकले पण १९४७ पासून ह्या दोन देशांमध्ये ठिणग्या पडायला सुरुवात झाली ज्याला शीतयुद्ध असे बोलले जाते. अमेरिका हा लोकशाही विचारांनी चालणार भांडवलशाही देश होता तर सोविएत रशिया साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कर्ता होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर रशियाने पूर्व युरोपीय देशांमध्ये साम्यवादी विचारसरणीची सरकारे स्थापन करायला सुरुवात केली. अमेरिका आणि ब्रिटनला हि भीती वाटू लागली कि पश्चिम युरोपीय देशामध्ये पण रशिया आपला प्रभाव पाडायला सुरुवात करेल. म्हणून त्या देशांना अमेरिकेने आर्थिक मदत देऊन आपल्या बाजूने वळवायला सुरुवात केली. ह्यातूनच शीतयुद्धाची सुरुवात झाली. पुढे सोव्हिएत रशियाचे विघटन होई पर्यंत हे छुपे युद्ध असेच सुरु होते. 

गेली कित्येक दशके जरी रशिया आणि अमेरिका हे देश एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरी सुमारे १५० वर्षांपूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. ह्या दोन देशांमध्ये तेव्हा मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच काळामध्ये रशियाने एक अशी चूक केली ज्याला इतिहासातील सर्वांत महागडी चूक बोलले जाऊ शकते. ती चूक म्हणजे अलास्काची विक्री. तुम्ही बरोबर वाचता आहात. आता जरी अलास्का हा अमेरिकेचा भाग असला तरी त्या काळी तो रशियाच्या अधिपत्याखाली होता. 

कित्येक लोकांना ठाऊक नसते पण अमेरिका आणि रशिया मध्ये केवळ अडीच मैल किंवा ४ किलोमीटर एवढेच अंतर आहे, अलास्का हा प्रदेश अमेरिकेच्या संघराज्याच्या भाग असला तरी रशिया पासून त्याचे अंतर काही मैलांचे आहे म्हणूनच रशियाकडे या प्रदेशाची मालकी होती.  

अमेरिका आणि रशियामधील अलास्का विक्री करार

अमेरिकेमध्ये सर्वांत पहिल्यांदा जर कुठे मानवाने वस्ती केली असेल तर ती म्हणजे अलास्का. सुमारे १५,००० वर्षांपूर्वी आशियाई वंशाच्या लोकांनी इथे पहिल्यांदा पाऊल ठेवले. पुढे हजारो वर्षे हा भाग जगापासून अलिप्तच राहिला. १७४१ मध्ये व्हिटस बेरिंग नावाचा रशियन एका मोहिमेवर होता तेव्हा त्याची ह्या भागावर नजर पडली. त्याने रशियन झारचा (सम्राट) झेंडा येथे फडकविला.

पुढे रशियन फरचे (प्राण्यांचे केस जे उबदार कपड्यांसाठी वापरले जातात) व्यापारी अलास्कामध्ये येऊन वर्षाचा काही काळ राहू लागले. पण त्यांना अन्न आणि अन्य मूलभूत गोष्टींसाठी स्थानिक लोक, अमेरिका आणि इंग्लंड ह्यांच्यावर अवलंबून राहावे लागत असे. रशियन लोकांची कायमस्वरूपी वस्ती येथे नव्हती.

अलास्काला बर्फाळ वाळवंट बोलले जाऊ शकते आणि तेथील हवामान हे मानवाने वस्ती करून राहण्यासाठी पूरक नव्हते. तसेच रशियाने त्या वेळी ह्या भागाच्या संरक्षणासाठी कोणतीही तजविज केली नव्हती. त्यामुळे त्यांना अशी भीती वाटत होती कि अमेरिका कधी पण हा भाग बळकावू शकते.

तो काळ वसाहतींचा होता आणि साम्रज्यवादी देश तेव्हा खूप प्रबळ झाले होते. ब्रिटिशांची ताकद तर खूपच जास्त होती आणि त्यांच्यापासून हा भाग वाचविणे रशियाला खूप कठीण गेले असते. तसेच क्रिमियन युद्धामध्ये (१८५३ – ५६) रशियाला ब्रिटिशांनी मात दिली होती आणि त्यामुळे रशियाला आर्थिक चणचण पण भासत होती.

रशियाचा झार अलेक्झांडर दुसरा ह्याने अलास्का विकायचा निर्णय घेतला. १८५९ मध्ये त्याने तसा अधिकृत प्रस्तावच ब्रिटन आणि अमेरिका ह्यांच्यासमोर ठेवला. ब्रिटिशांनी त्यामध्ये जास्त रस दाखविला नाही. अमेरिकेमध्ये अंतर्गत यादवी युद्ध सुरु असल्यामुळे त्यांनी पण ह्या प्रस्तावाकडे डोळेझाक केली. १८६५ मध्ये ते युद्ध संपले आणि अमेरिकेने त्या प्रस्तावामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली.

३० मार्च १८६७ मध्ये अलास्का विक्री करारावर स्वाक्षरी करण्यात आली. जवळपास ६ लाख चौरस किलोमीटर (भारताच्या जवळपास अर्धा) एवढा मोठा भाग हा अत्यल्प किमतीमध्ये म्हणजेच अंदाजे ५० कोटी रुपये (आताचे ८६० कोटी) हा अमेरिकेच्या स्वाधीन करण्यात आला. त्यावेळेला अनेक अमेरिकन राजकारण्यांनी सरकारच्या ह्या निर्णयाला कडाडून विरोध केला इतकेच नव्हे तर हा निर्णय म्हणजे केवळ एक मूर्खपणा आहे असे हिणवले गेले.

पण आता जवळपास दिड शतकांच्या कालावधीनंतर ह्या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जाऊ शकते. जर अलास्का रशियाच्या ताब्यात राहिला असता तर त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे त्यांना फायदा झाला असता. आज या प्रदेशात सोन्याचे साठे देखील सापडले आहेत, अलास्काची ओळख आज धरतीतलावरचा स्वर्ग म्हणून केली जाते. एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून अमेरिकेने त्यांच्या खरेदीचा किमतीपेक्षा १० पॅट जास्त पैसे अलास्का मधून कमावले आहेत.  

अमेरिकेला येथे तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडले. तसेच सागरी मासेमारीच्या दृष्टीने हा प्रदेश खूप महत्वाचा आहे कारण त्याच्या सीमा ह्या तीन वेगवेगळ्या समुद्रांशी जोडलेल्या आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने पण अमेरिकेला ह्या प्रदेशाचा फायदा होतो. येथे लोकसंख्या विरळ असल्यामुळे लष्कराला उपयोग होतो. नवीन शस्त्रात्रांचे परीक्षण करण्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जातो.