उद्योग का व्यवसाय – काय फरक आहे दोन्हीत ?

मी एक दिवस उबेर मधून जात असताना त्या चालकाशी गप्पा मारत होतो. मराठवाड्यातून येऊन त्याने स्वतःच्या हिमतीवर काही मराठी तरुणांकडून कसा व्यवसाय चालू केला हे तो मला सांगत होता. मला अभिमान वाटलं त्या पोराचा. कष्ट करायची तयारी असेल तर व्यवसाय कर्ण अवघड नसतं असं तो मला बोलून गेला, आणि मग माझा डोक्यात चालू झाले ते प्रश्नांचे वावटळ. व्यवसाय म्हणजे काय ? व्यवसाय आणि उद्योग यात काय फरक आहे ?  

उबेरसाठी गाडी चालवणं हा व्यवसाय असतो का ? स्वतःची गाडी घेऊन ती स्वतः चालवली म्हणून तिला खरं तर व्यवसाय म्हणता येत नाही हि एक प्रकारची चाकरीच आहे तिला उबेर या  कंपनीने भागीदारी हे नाव दिल आहे. पण याला आयकर किंवा इतर कायद्यांमध्ये व्यवसाय म्हणूनच संबोधलं आहे. सीए, डॉक्टर, वकील हे सगळे व्यावसायिक यांना आपण उद्योजक म्हणत नाही. सेवा देणं हे व्यवसायाचं महत्वाचं उद्दिष्ट असत. व्यवसाय करायला कौशल्य लागते.      

उद्योग म्हणजे विक्री हे तत्व जर अंगी भिनल तर कोणताच उद्योग अवघड नाही. तो सॉफ्टवेयर बनवायचा असेल नाही तर दुचाकी बनवायचा, उद्योगाचे महत्वाचं उद्दिष्ट हे नफा कमावणे एवढच असत.  

उद्योगाची निवड हि बहुतेकदा चुकणारी पायरी आहे. पायाच चुकलेला असेल तर इमारत कोसळणारच असते. असच काही उद्योगाच्या बाबतीतही घडत असतं. शेजारच्या कुणाचा तरी उद्योग यशस्वी झालाय म्हणून आपणही तो उद्योग करावा, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्याच्या यशाची कहाणी छापून आली म्हणून आपणही तोच उद्योग करावा, किंवा सगळे करतात म्हणून आपणही तेच करावे, किंवा कुणीतरी अमुक तमुक व्यवसाय कर त्यात खूप पैसा आहे असे सांगतोय म्हणून तोच उद्योग आपण करावा अशा प्रकारे उद्योग निवड करण्याची सर्वसामान्य पण तितकीच चुकीची पद्धत दिसून येते.

यातच ग्रामीण भागातील उद्योग म्हटले कि डाळ, मसाले, पापड, लोणचे उत्पादन इतकेच व्यवसाय सुचतात. त्यापलीकडेही शेकडो व्यवसाय आहे हे आपल्या गावीही नाही. जो तो उठतो तेच तेच व्यवसाय सुरु करतोय. जी स्थिती ग्रामीण भागातील तीच स्थिती शहरी भागातील. शहरी भागात सगळ्यांना ईकॉमर्स तरी चालू करायचा आहे किंवा अँड्रॉइड चा एप तरी बनवायचा आहे,  नवीन नवीन कल्पनांच्या धुराळ्यात योग्य उद्योग निवडणे आवश्यक झाले आहे.

उद्योग निवडताना तुमच्यासाठी काय योग्य आहे हे पाहायचे असते, ना कि इतरांनी काय केलंय, किंवा किती पैसे कमावलेत. व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठीच असतो व्यवसाय निवडताना विचारपूर्वक निवडणे महत्वाचे असते.

उद्योगाची निवड करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा  लागतो. तुम्हाला कोणत्या क्षेत्राचे ज्ञान आहे, तुमच्या परिसरातील बाजारपेठ कशी आहे, तुमचे वैयक्तिक संपर्क कसे आहेत, परिसरातील ग्राहकांची मानसिकता कशी आहे, तुमची गुंतवणूक क्षमता किती आहे, तुम्ही उद्योगासाठी कोणत्या स्तरापर्यंत वेळ देऊ शकता, तुमचा अनुभव व शिक्षण काय आहे, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात रस आहे अशा वेगवेगळ्या बाबी ध्यानात घेऊन उद्योग निवडायचा असतो.

उबेरसाठी गाडी चालवणं हा व्यवसाय असतो का ? स्वतःची गाडी घेऊन ती स्वतः चालवली म्हणून तिला खरं तर व्यवसाय म्हणता येत नाही हि एक प्रकारची चाकरीच आहे तिला उबेर या  कंपनीने भागीदारी हे नाव दिल आहे. हा आयकर किंवा इतर कायद्यांमध्ये व्यवसाय म्हणूनच संबोधलं आहे. सीए, डॉक्टर, वकील हे सगळे व्यावसायिक यांना आपण उद्योजक म्हणत नाही.    

उद्योग म्हणजे विक्री हे तत्व जर अंगी भिनल तर कोणताच उद्योग अवघड नाही.

उद्योगाची निवड हि बहुतेकदा चुकणारी पायरी आहे. पायाच चुकलेला असेल तर इमारत कोसळणारच असते. असच काही उद्योगाच्या बाबतीतही घडत असतं. शेजारच्या कुणाचा तरी उद्योग यशस्वी झालाय म्हणून आपणही तो उद्योग करावा, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्याच्या यशाची कहाणी छापून आली म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा, किंवा सगळे करतात म्हणून आपणही तेच करावे, किंवा कुणीतरी अमुक तमुक व्यवसाय कर त्यात खूप पैसा आहे असे सांगतोय म्हणून तोच व्यवसाय करावा अशा प्रकारे व्यवसाय निवड करण्याची सर्वसामान्य पण तितकीच चुकीची पद्धत दिसून येते.

यातच ग्रामीण भागातील व्यवसाय म्हटले कि डाळ मिल, मसाले, पापड, लोणचे उत्पादन इतकेच व्यवसाय सुचतात. त्यापलीकडेही शेकडो व्यवसाय आहे हे आपल्या गावीही नाही. जो तो उठतो तेच तेच व्यवसाय सुरु करतोय. यामुळे व्यवसाय क्षेत्रात एक प्रकारचे व्यवसायाचे डबके तयार झालेले आहे. या डबक्यातून बाहेर येणे आवश्यक आहे. योग्य व्यवसाय निवडणे आवश्यक झाले आहे.

व्यवसाय निवडताना तुमच्यासाठी काय योग्य आहे हे पाहायचे असते, ना कि इतरांनी काय केलंय, किंवा किती पैसे कमावलेत. व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठीच असतो, आणि प्रत्येक व्यवसायात भरपूर पैसे मिळत असतो. त्यामुळे व्यवसाय निवडताना विचारपूर्वक निवडणे महत्वाचे असते.

व्यवसाय निवड करताना बऱ्याच गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. तुम्हाला कोणत्या क्षेत्राचे ज्ञान आहे, तुमच्या परिसरातील मार्केट कसे आहे, तुमचे वैयक्तिक संपर्क कसे आहेत, परिसरातील ग्राहकांची मानसिकता कशी आहे, तुमची गुंतवणूक क्षमता किती आहे, तुम्ही व्यवसायासाठी कोणत्या स्तरापर्यंत वेळ आणि कष्ट देऊ शकता, तुमचा अनुभव व शिक्षण काय आहे, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे अशा वेगवेगळ्या बाबी ध्यानात घेऊन व्यवसाय निवडायचा असतो.