एखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं ?

0
496
बरेच जण आजकाल उबरचे मोबाईल एप्लिकेशन वापरतात. उबेर हि आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन मिळालेली कंपनी मानली जाते. दहा वर्षांपूर्वी चालू झालेल्या या कंपनीचे आजचे बाजार मूल्य ४,५५,००० कोटी रुपये इतके महाप्रचंड आहे. या कंपनीच्या तंत्रज्ञानाने ग्राहकांना विनासायास टॅक्सी मिळवून देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आज जगातल्या अनेक महत्वाच्या देशात हि कंपनी काम करते, या  कंपनीने २००९ सालापासून अनेक वेळा कित्येक हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे केले आहेत. पण म्हणून आता प्रश्न असा आहे कि या कंपनीने जनमानसाचे प्रश्न सोडवले, अनिश्चितते मध्ये प्रचंड विस्तार केला म्हणून आपण तिला १० वर्ष नंतर पण स्टार्टअप म्हणू शकतो का ? याचा खर उत्तर आहे – आजीबात नाही.
कोणत्याही व्यवसायाचे भवितव्य निश्चित होण्यासाठी साधारण १००० दिवसाचा कालावधी जावा लागतो आणि तोवरच एखाद्या कंपनीला स्टार्टअप म्हंटलं जाऊ शकतं, साधारण १००० दिवसानंतर ती कंपनी तोट्यात असेल तर
  1. कंपनी तोट्यात असल्याने बंद करायला लागते किंवा
  2. एखाद्या प्रस्थापित कंपनी द्वारे तिचे अधिग्रहण होते
जर कंपनी १००० दिवसात चमक दाखवू शकली तर
  1. विक्रीचे आकडे सात आकडे पार करून धावायला लागतात
  2. कंपनीचे एका पेक्षा जास्त ठिकाणी काम चालायाला लागते
  3. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढून ५० च्या पुढे जाते
  4. कंपनीच्या संचालक मंडळावर प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होऊ लागतो
खर सांगायचं तर नफा कमावणाऱ्या कंपनीला स्टार्टअप म्हणवून घेणं म्हणजे हिणवल्या सारखाच असतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here