कंपनी कायदा २०१३ आणि आर्थिक घोटाळ्यात करियर


५७ वर्षाच्या कालखंडा नंतर २०१३ साली भारताच्या कंपनी कायद्यात महत्वपूर्ण बदल झाले. अनेक नवीन तरतुदी या कायद्यात आल्या आणि कंपनी कायद्याने कात टाकली.  पण नवीन कायद्या मधील काही तरतुदी या सनदी लेखापाल (CA ) आणि कंपनी सचिव (CS) व्यावसायिकांचा विरोधात गेल्या. खाजगी कंपनीच्या सचिवांची कामे कमी करायची तरतूद या कायद्यात आली आणि त्याचेच पडसाद दिल्ली, अहमदाबाद आदि ठिकाणी उमटले, कंपनी सचिव रस्त्यावर उतरले, आंदोलने झाली, कंपनी सचिवांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. सनदी लेखापालांवर जबाबदारी प्रचंड वाढली त्यामुळे ते हि विशेष खुशीत नाहीत.   

नवीन कायद्याचा तरतुदींवर सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव जरी नाराज झाले असले तरी कंपनी कायदा २०१३ आल्याचा सर्वात जास्त आनंद झाला तो प्रमाणित फोरेंसिक लेखा परीक्षकांना. या नवीन कायद्याचा ४४७ कलमात प्रथमच कंपनी घोटाळ्याची व्याख्या केली गेली आहे. त्यामुळेच असा मानल जात आहे कि नवीन कंपनी कायद्यामुळे आर्थिक घोटाळ्यांचा विरोधात एक नवीन पर्व चालू  झाले आहे. कॉरपोरेट जगतामधल्या ह्या बदलाने  सर्वच कंपन्यांना एका गोष्टीची पूर्ण जाणीव झाली आहे कि आर्थिक घोटाळे घडले तर आता संचालक, स्वतंत्र संचालक आणि लेखापरीक्षक या सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. नवीन कायदा आल्यावर जशा कंपन्या या नवीन प्रश्नाशी लढण्यासाठी सरसावयला लागल्या तसं त्यांना जाणवतंय कि या  आर्थिक घोटाळ्यानच्या लढाईत लढणाऱ्या शिलेदारांची रसद खूपच कमी आहे त्यामुळेच सर्टीफाईड फोरेंसिक अकाउंटिंग प्रोफेशनल्स झालेल्या विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. 
फोरेंसिक अकाउंटिंग म्हणजे काय ?
फोरेन्सिक अकाउंटिंग/ लेखापरीक्षण म्हणजे कोर्टासमोर असलेल्या अथवा जायची शक्यता असलेल्या आर्थिक पुराव्यांचे विष्लेषण. कर्मचाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्या पासून ते ताळेबंदातील हेराफेरी पर्यंत सर्व प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहाराची तपासणी करायला आज गरज पडते ती प्रमाणित फोरेंसिक लेखा परीक्षकांचि. 
नवीन कायद्यामध्ये घोटाळे करणाऱ्या कंपनीचा संचालकाला आणि महत्वाच म्हणजे लेखा परीक्षकाला जबर दंड आणि तुरुंगवासाची तरतूद या कायद्यात असल्याने सर्व सनदी लेखापाल (CA) मंडळींमध्ये धास्तीच वातावरण आहे. सत्यम सारख्या घोटाळ्यात लेखापरीक्षण करणाऱ्या फर्मने आपली जबाबदारी झटकून टाकली होती आणि आळ केवळ दोन भागीदारांवर आला पण आता नवीन कायद्या प्रमाणे फर्मची जबाबदारी वाढली आहे. केवळ हेच नाही तर आर्थिक घोटाळे कोणत्या स्तरावर होऊ शकतात आणि त्याचा दंड किती असावा याची माहिती देणाऱ्या अनेक तरतुदी नवीन कायद्यात आहेत. 
सनदी लेखापाल (Chartered Accountant) सत्य (true) व न्याय्य (fair) असे मत (opinion) देण्याचे काम करतो तर फोरेन्सिक अकौन्टन्ट आर्थिक घोटाळा झाला आहे किंवा कसे यावर मत देण्याचे काम करतो. “फॉरेन्सिक अकाउंटंट’ आकड्यांचा पुढे जातो व लेखापरीक्षणाच्या कक्षेबाहेरील बाबींचा शोध घेतो.  फॉरेन्सिक अकौन्टिन्ग मध्ये हिशेबाचे दंडक व धोरणे यांवर कमी भर असतो; परंतु वित्तीय गैरव्यवहारांची कुठलीही शक्‍यता पडताळून ती उघड करण्याकडे संपूर्ण जोर असतो.कंपनी कायद्यातील बदलामुळे तर येत्या काही दिवसात भारतात सर्टीफाईड फोरेंसिक अकाउंटिंग प्रोफेशनल्सची मागणी कित्येक पटीने वाढायची शक्यता आहे. भारतामध्ये या विषयावर शास्त्र शुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देणारी इंडियाफोरेंसिक ही एकमेव संस्था आहे, अमेरिकेतील काही संस्था अशा पद्धतीचे प्रशिक्षण देतात पण आता बदललेला कंपनी कायदा त्यांचा अभ्यासक्रमात नाही आणि अमेरिकेमधील कायदे शिकून भारतात काम मिळायची शक्यता नाही. 
सर्टीफाईड फोरेंसिक अकाउंटिंग प्रोफेशनल या एकमेव अभ्यासक्रमात कंपनी कायद्यातील बदललेल्या तरतुदींचा अविर्भाव आहे. कलम ४४७ असो वा कलम ७(५), या अभ्यासक्रमात त्याची तपशीलवार माहिती आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे extension म्हणता येईल असा हा अभ्यासक्रमाचा पर्याय आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करायला ३ वर्षाचा अनुभव आर्थिक क्षेत्रात असणे आवश्यक आहे.भारतातील आर्थिक घोटाळे, कंपनी घोटाळे आणि भांडवली बाजारातील घोटाळे यावर भाष्य करणारा सर्टीफाईड फोरेंसिक अकाउंटिंग प्रोफेशनल हा अभ्यासक्रम असल्याने कित्येक मोठ्या कंपन्यांचे स्वतंत्र संचालक, कार्यकारी संचालक आणि लेख परीक्षक मंडळ कंपनी कायद्याचा जाचक तरतुदींवर मात करण्यासाठी कंपनीचा व्यवहारातील अनेक गोष्टींवर सर्टीफाईड फोरेंसिक अकाउंटिंग प्रोफेशनल्स कडून मत मागण्याची शक्यता आहे. कंपनीचा व्यवस्थापनाने घोटाळे केलेले असताना त्याचा आळ लेखा परीक्षकावर येऊ नये यासाठी पण अनेक मोठ्या लेखापरीक्षक फर्म प्रमाणित फोरेंसिक लेखापरीक्षकांना नौकर्या देण्याची शक्यता आहे, इंडियाफोरेंसिक संस्थेने केलेल्या पाहणीत सुमारे ५० हून जास्त कंपन्यातील ५०० हून अधिक सभासदांनि भाग घेतलेला या पाहणी नुसार सर्टीफाईड फोरेंसिक accounting प्रोफेशनलचा average पगार हा ६.८९ लाख असतो म्हणजेच केवळ लेखापारीक्षाका पेक्षा किमान २०% अधिक यावरूनच लक्षात येत कि हे क्षेत्र केवळ उपयुक्त आणि वेगळच नाही तर फायदेशीर पण आहे. आता कायद्यानेच सांगितलेल असल्याने “फॉरेन्सिक अकाउंटिंग’चे क्षेत्र विस्तारत जाणार आहे हे निश्चित !