कथा व्हॉट्सएपच्या यशस्वी प्रवर्तकाची 

116

नविन कल्पना येत राहणे हे जिवंत माणसाचे लक्षण आहे.  जगाच्या कॉर्पोरेट इतिहासात अशी अनेक उदाहरण सापडतील ज्यात पहिल्या प्रयत्नात यश न येऊन देखील अनेक स्टार्टअप यशस्वी ठरल्या. त्यातील एक म्हणजे व्हाट्सअप. याचा प्रवर्तक ब्रायन अ‍ॅक्टन याची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे.   

२००९ हे वर्ष ब्रायन अ‍ॅक्टनची खूप परीक्षा घेणारे होते. त्याच्या गाठीला तंत्रज्ञान क्षेत्रातील १२ वर्षांचा तगडा अनुभव होता. मे २००९ मध्ये त्याने ट्विटर कंपनीमध्ये नोकरीसाठी मुलाखत दिली पण त्याची निवड झाली नाही. पुढच्याच महिन्यात त्याने फेसबुक कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. तिथे सुद्धा त्याच्या हाताला अपयशच लागले.

सामान्य माणसे अपयशाने खचून जातात पण असामान्य माणसे अपयशाला एखाद्या आव्हानाप्रमाणे स्वीकारतात.

ब्रायन अ‍ॅक्टन अपयशाने अजिबात खचला नाही उलट त्याने एक नवीन कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. याहू कंपनीतील त्याचा जुना सहकारी जॅन कौमला सोबतीला घेऊन त्याने व्हाट्सअप हे संदेशवहनासाठी वापरले जाणारे मोबाईल ऍप बनविले.

व्हाट्सअप चे तंत्रज्ञान खूपच अनोखे होते. त्यावेळेला बाजारात उपलब्ध असणारी संदेश पाठविण्याची ऍप्स थोडी किचकट असत आणि इंटरनेट नसताना पाठविलेला मेसेज खूपदा हवेत विरून जायचा. हा प्रश्न ब्रायन अ‍ॅक्टनच्या चाणाक्ष नजरेने अचूक हेरला आणि त्यावर त्याने तोडगा देखील काढला. जर इंटरनेट नसताना तुम्ही एखादा मेसेज ह्या ऍप द्वारे पाठविला तर तो इंटरनेट आल्यावर पाठविला गेला. तस खूपच लहान प्रश्न आणि त्याच खूपच सोपा आणि साधारण उत्तर. आपण जर स्टार्टअप्स चा इतिहास पहिला तर असं लक्षात येत कि स्टार्टअप्स तेच यशस्वी होतात जे सर्व साधारण माणसाला काळातील अशी क्लिष्ट प्रश्नांची उत्तर देतात.  हे ऍप वापरण्यास खूपच सोपे होते.

अवघ्या काही दिवसांत व्हाट्सअप ऍपनेमोबाईल मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस खूपच वाढायला लागली. ह्याचा परिणाम कुठे तरी फेसबुक सारख्या सोशल मीडिया कंपनीवर होऊ लागला. फेसबुकने तेव्हा स्वतःचे मेसेंजर बनवून बाजारात आणलेल.  पण मेससेंजर आणि फेसबुक ऐवजी वापरकर्ते व्हाट्सअपकडे ओढले जाऊ लागले. 

काळाची दिशा ओळखून फेसबुकला एक मोठा निर्णय घेणे भाग पडले. व्हाट्सअप ऍप 1600 कोटी डॉलर्सला विकत घ्यावे लागले. इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठ्या डीलपैकी हे एक होते.

अशा प्रकारे ज्या माणसाला फेसबुकने नोकरी देण्यास नकार दिला त्याच माणसाने त्यांच्या नाकावर टिच्चून एक लोकप्रिय ऍप बनविले. म्हणतात ना “प्रयत्ने वाळूचे कां रगडीता तेलही गळे”