केम्ब्रिज अनॅलिटीका डेटा घोटाळा

1755

केंब्रिज युनिव्हर्सिटीमधील डेटा वैज्ञानिक, अलेक्झांडर कोगन यांनी “this is your digital life” नावाचे एक फेसबुक एप विकसित केले. हे एप त्यांनी केंब्रिज अनॅलिटीकला विकले.

केंब्रिज अनॅलिटीका ने मोठ्या खुबीने फेसबुक वापरकर्त्यांकडून त्यांची वैयक्तिक माहिती वापरायची परवानगी प्राप्त केली आणि जवळ पास ५ कोटी पेक्षा जास्त लोकांच्या माहितीचा साठा त्यांच्या कडे जमा झाला. ते काय लिहतात, कोणाला फॉलो करतात याचे विवेचन करून केम्ब्रिज अनॅलिटीका मग राजकारणी लोकांना हे विवेचन विकू लागली. संशोधनासाठी मिळालेली संमती प्रत्यक्षात राजकारणातील अनेक व्यवसायात वापरली गेली.

17 मार्च 2018 रोजी एकाच वेळी न्यू यॉर्क टाईम्स सारख्या वर्तमान पत्रांनी एकाच वेळेस हि कथा प्रकाशित केले आणि यामुळे लोकांमध्ये मोठा संताप झाला. दिवसांत फेसबुकचे बाजार भांडवल १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमी झाले आणि अमेरिका आणि ब्रिटनमधील राजकारण्यांनी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्याकडे जाब विचारला. पाच अब्ज डॉलर्सचा दंड भरून फेसबुकने या प्रकरणातून आपली मान सोडवून घेतली.

अमेरिकेतील ट्रम्प यांचा निवडणुकीतील विजय असेल किंवा ब्रिटन मधील ब्रेक्झिट घटना असेल केम्ब्रिज अनॅलिटीका चा डेटा जनमत बनवण्यासाठी वापरला गेलेला. या घोटाळ्यामुळं लोकांना जाणीव झाली कि जगात फुकट काहीच नसते जर तुम्हाला कोणी पैसे मागत नसेल तर तुम्हीच एक विक्रीयोग्य वस्तू आहात हे लोकांना या घटने नंतर लक्षात यायला लागले.

भारतावर या घटनेचा परिणाम

भारतात देखील केम्ब्रिज अनॅलिटीकाने व्यवसायवृद्धी साठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. केम्ब्रिज अनॅलिटीका हि खरं तर एससीएल समूहातील एक कंपनी. अलेक्झांडर निक्स हा या कंपनीचा सर्वेसर्वा.

भारतामध्ये केम्ब्रिज अनॅलिटीका स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरी नावाने अस्तित्वात आहे. त्याचे एक संचालक अमरीश कुमार त्यागी हे जनता दल (युनायटेड) चे के सी त्यागी यांचे चिरंजीव. के सी त्यागी हे नितीश कुमार यांच्या जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि राज्यसभेचे खासदार.

अमरीश त्यागी यांनी २०१५ च्या निवडणुकात नितीश कुमार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आणि म्हणूनच कदाचित मोदी लाटेत सुद्धा नितीश कुमार यांची नाव तरलेली.

राजकीय हेतूने प्रेरित व्यक्तींच्या व्यवसायात जोखीम असते म्हणतात ना ती हीच. के सी त्यागी हे राजकारणी आणि त्यांचे चिरंजीव अमरीश त्यागी यांनी या कम्पनीला भारतात आणून हात पाय पसरायचा प्रयत्न केला पण तो जमला नाही म्हणून आज लोकशाही शाबूत आहे, अन्यथा भारतात पण जनमत तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलायला वेळ नसता लागला.

या कंपनीचे अजून एक संचालक हे अवनीश कुमार रे आहेत ज्यांच्या बद्दल फार कोणाला काही माहिती नाही असे इंटरनेट वर शोधल्यावर जाणवते. भारतात केम्ब्रिज अनॅलिटीका ने हात पाय पसरायचे प्रयत्न केले खरे पण त्यांच्या गळाला कोणी लागलं असेल अस दिसत तरी नाही.

मुळात एक एप बनवून खूप सारी माहिती गोळा करून त्यांची जातीनिहाय विभागणी करायची कल्पना यांचीच होती असे मानले जाते अनेक वर्षांपासून भारतात ते बिहार उत्तर प्रदेश परिसरातील निवडणुकात अशा पद्धतीची माहिती राजकारण्यांच्या निवडणुकात वापरात होते.