गुप्तवार्ता म्हणजे काय ? ती महत्वाची का ठरत आहे ?

  475

  गुप्तवार्ता (इंटेलिजन्स) शब्दाला गेल्या काही वर्षात अचानक महत्व प्राप्त झालं आहे. 

  जगातील दुस-या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे ‘हेरगिरी’.आर्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र’ मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. याबाबत विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेले आहे. त्यांनी केलेल्या गुप्तवार्ता नीतींमुळेच त्यांना कौटिल्य (कुटील) देखील संबोधले जाते. 

  जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत आणि त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात. आंतरजालावर माहिती चुटकी सरशी मिळायला लागल्या पासून लोकांना बहिर्जी नाईक हे एक गुप्तहेर होते हे कळू लागले आहे पण शिवाजी महाराजांचे हेरखाते इतके गुप्त होते की त्यात नेमकी किती माणसे कामाला होती, त्यांचे दैनंदिन काम काय होते हे आजही न उकललेले गूढ आहे. आज समकालीन कागदपत्रांद्वारे काही मोजक्याचं नावांचा उल्लेख येतो.त्यात विश्वासराव मोसेखोरे,बहिर्जी नाईक-जाधव, सुंदरजी प्रभुजी, वल्लभदास गुजराथी, महादेव माळी इत्यादी नावे आढळतात.चाणक्य असेल कीं किंवा शिवाजी महाराज असतील गुप्तवार्ता खात्याचे प्रकार दोनच.
  एक म्हणजे अधिकृत गुप्त वार्ता विभाग आणि दुसरे म्हणजे राजांच्या वतीने राज्याराज्यांत फिरणाऱ्या वकील, मनसबदार इत्यादी मंडळींकडून मिळणारी माहिती. याच तंत्राचा उपयोग आता भारतातल्या बँका करायला लागल्या आहेत पण निवडक.  

  आता इंटेलिजन्सचा उपयोग आर्थिक क्षेत्रात देखील केला जातो.
  गेल्या काही दिवसात उघडकीला आलेल्या घोटाळ्यांच्या प्रकरणात बँकिंग क्षेत्राला हे समजायला लागले कि त्यांना खातेदारा बद्दल अशाच प्रकारचा इंटेलिजन्स गोळा करायला हवा आहे. गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेने पण यावर शिक्का मोर्तब केलं कि बँकेकडे स्वतःच वेगळा गुप्तवार्ता विभाग हवा.  कोणत्याही बँकेसाठी आर्थिक घोटाळ्यांच्या लढाईतील मुख्य फळी म्हणजे त्यांचे गुप्तवार्ता विभाग असायला हवे. आर्थिक घोटाळे घडून गेल्यावर त्यांचे उत्खनन करायला आज मोठ्या मोठ्या बॅंकर्सची फौज तयार असते पण तीच गुंतवणूक समजा बँकांनी गुप्तवार्ता खात्यावर केली आणि आधीच आपल्या खातेदाराची माहिती तयार ठेवली तर मग पुढे त्या व्यवहारात काय जोखीम आहे हे पाहायला पुन्हा बँकांची खाती सज्ज आहेतच.
  बँकिंग संस्था या पूर्वीच्या राज्य व्यवस्थेसारख्या आहेत, राजाच्या वतीने गावागावात फिरणारे वकील आणि मनसबदार म्हणजे बँकांसाठी मार्केटिंग करणाऱ्यांची फौज, कर्ज वाटण्यासाठी ते अनेक लोकांना भेटत असतात, या खेरीज आजकाल बँकात पत्ते आणि इतर माहिती खरी भरली आहे किंवा नाही हे पाहायला जाणाऱ्या लोकांची पण वानवा नसते. ही सर्व मंडळी बँकेचे कान असतात पण त्यांच्या कडून योग्य माहिती काढून घेणे हे देखील गुप्तवार्ता विभागाचे काम असते.यातून ग्राउंड रिऍलिटी कळू शकते.
  आज बँकिंग व्यवस्थे मध्ये जवळपास ४८ लाख कोटी रुपयांची कर्ज हि राजकीय हेतूने प्रेरित व्यक्ती आणि त्यांच्या कंपन्यांना दिली गेलेली आहे आज कोणतेही अनुत्पादक खाते काढून पहा त्यात कोणी ना कोणी राजकीय व्यक्ती सापडतेच.
  त्यामुळे आज बँकांना कर्ज देण्यापूर्वीच हे जाणून घेण्याची गरज आहे कि मोठ्या कर्जदारामागे कोणत्या राजकारण्यांचा वरदहस्त आहे. एखाद्या पक्षाची सत्ता असे पर्यंत असे व्यवसाय फार आकर्षक असतात कारण अशा व्यवसायांना सरकारी कामं मिळत राहतात आणि बँकांना भरघोस व्याज मिळत राहतं, पण सत्ता बदलली किंवा राजकारण्यांची गरज संपली कि असे व्यवसाय चटकन लयाला जातात, भारतात ऊर्जा क्षेत्रात आलेली तेजीच आज बँकांच्या पहिल्या १२ अनुत्पादक कर्जात परावर्तित झालेली आहेत. नोटा किंवा कॅश हाच तर बँकिंग व्यवसायाचा कच्चा माल आहे त्यामुळेच बँकांना मार्गी लावायला राजकारण्यांना पासून ते दहशतवाद्यां पर्यंत सगळेच टपलेले असतात. गुप्तवार्ता विभाग हा या सर्व लोकांची कुंडली मांडायचा प्रकार आहे. शत्रूच्या गोटात घुसायला बहिर्जींनी वेषांतर करावा लागला पण आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष शत्रूचा अथवा कर्जदाराच्या दारात जायची गरज नसते, गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची. तंत्रज्ञान आणि बाजारात उपलब्ध माहिती यांची सांगड घातली तर एक उत्तम गुप्तवार्ता व्यावसायिक होता येऊ शकत