चीनची सर्चइंजिन क्षेत्रातील बैदुगिरी

या सदरात आपण पाहणार आहोत माहिती बॅटच्या पहिल्या पर्वाची म्हणजेच बैदु या कंपनीची

324

भारतात टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल या कंपन्यांना जसे बिग फोर आयटी कंपन्या म्हंटले जाते तसे चीन मध्ये बैदु, अलीबाबा आणि टेन्सण्ट या कंपन्यांना बॅट संबोधले जाते. ‘बैदु’ हे चीनी आणि जपानी भाषांमध्ये शोध घेण्याचे सर्वोत्कृष्ट सर्च इंजिन आहे. जग भरात गूगलचा जो दरारा आहे तोच बैदुचा चीन आणि जपान मध्ये आहे.  बैदुची स्थापना १४ जानेवारी २००० रोजी झाली. बैदुच्या एकूण ५४ शोध-सेवा अस्तित्त्वात आहेत. रॉबिन ली आणि एरिक जू हे त्याचे संस्थापक होते. दोन्ही संस्थापक चिनी आहेत. बैदु हे जगातल ४ नंबरचे सर्वात जास्त पाहिलं जाणारं संकेतस्थळ आहे. 

८०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका कविते मधून बैदु हे नाव घेण्यात आलं ज्याचा शब्दशः अर्थ होतो “कित्येकशे पटीनं”. 

बैदुचे मुख्यालय चिनची राजधानी बीजिंग येथे आहे. बैदुमध्ये जवळपास ४५,००० लोक काम करतात.  बैदु हि नॅसडॅक भांडवल बाजारात नोंदवली गेलेली कंपनी आहे जिचे बाजार मूल्य ९९ बिलियन डॉलर्स एवढे महाप्रचंड आहे. नॅसडॅक निर्देशांकात समावेश असलेली हि एकमेव चायनिज कंपनी आहे. आज बैदुचे जवळपास १ अब्ज वापरकर्ते आहेत.

बायडूचे संस्थापक आणि सीइओ रॉबिन ली हे आहेत, ते अगदी गरीब परिस्थितीतून येतात, त्यांचे वडील हे एका छोट्याश्या गावात कारखान्यात मजुरी करायचे. शिक्षणासाठी रॉबिन काही काळ अमेरिकेत होते, तिथे असताना त्यांनी बायडूच बेसिक सॉफ्टवेअर तयार केलं होत. रँकडेस्क नावाची प्रणाली शोधून रॉबिनने त्यावर पेटटण्ट देखील घेतले होते.    

चिनी सरकारच्या संकल्पनांना खतपाणी घालणारी कंपनी म्हणून बैदु कडे पाहिले जाते, चीन मध्ये गुगल वापरायला बंदी घातल्यानेच बैदुचा उदय झाला त्यामुळेच असेल कदाचित पण चीन संदर्भातील अनेक विषयांवर बैदुने अघोषित बंदी घातली आहे. चीन अमेरिका व्यापार युद्धामुळे गुगल आणि बैदु या कंपन्यातील सर्च युद्धाला वेगळच स्वरूप प्राप्त झाले. 

वैद्यकीय सेवांच्या जाहिराती मधून मिळणारे उत्पन्न अधिक असल्याने अनेकदा हि कंपनी गोत्यात येत चालली आहे, यांच्या सर्चमध्ये पहिल्या क्रमांकावर जाहिरातदारांनी संकेतस्थळे दाखवली जातात तर गुगल स्पष्टपणे जाहिरातदारांनी संकेतस्थळे वेगळी दाखवत.  

बैदुवर शोध घेणारे  लोक बरेचदा या सर्च इंजिनवर विश्वास ठेवून या सेवा घेण्यासाठी गेल्यावर काही लोकांच्या जीवावर बेतल्याने आता या सर्चबद्द्दल अस्वस्थता वाढत चालली आहे याचमुळे असेल कदाचित गुगलला चीन मधून गाशा गुंडाळावा लागल्या नंतर पुन्हा आता गुगल हॉंगकॉंग मध्ये बस्तान बसवू पाहत आहे. 

बैदु हि फार महत्वाकांक्षी कंपनी आहे, त्यांनी चिनी लोकांची त्यामुळे त्यांनी गुगल प्रमाणे न्यूज, टीव्ही, मॅप या सगळ्याच क्षेत्रात चीन मधे मक्तेदारी स्थापन केली आहे.आज त्यांच्याकडे स्वतःचे अँटी व्हायरस सॉफ्टवेयर, स्वतःचा ब्राउजर असे विविध सॉफ्टवेयर्स आहेत. 

बातम्यांपासून ते चिनी सरकारला साहाय्य होईल अशा पद्धतीने काय दाखवायचे आणि काय नाही दाखवायचे हे ठरवणाऱ्या बैदुचा चिनी लोकांचे दृष्टिकोन घडवण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.