नेटफ्लिक्सची कल्पना कशी सुचली ?

139

स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनांचा सुकाळ. एखादा क्लिष्ट किंवा जटिल प्रश्न सोडवायच्या कल्पनेवर आधारीत केलेल्या व्यवसायाची निर्मिती. अनेकदा मला प्रश्न विचारला जातो कि कल्पना कशा येतात ? पण कल्पना सुचणे हि काही एका दिवसाची प्रक्रिया नाही त्याच्या मागे असते ती दीर्घ तपस्या. आपल्या देशात इतके प्रश्न आहेत कि त्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर शोधल तर हजारो नवीन कल्पना मिळतील पण ती कल्पना जोपासावी लागते, त्या कल्पनेचं स्वप्नात रूपांतर व्हावं लागत आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करावे लागतात. आज कल्पना विलासात रमणारे अनेक विद्यार्थी दिसतात. 

तो डीव्हीडींचा जमाना होता. जर एखाद्या माणसास नवीन सिनेमा घरी बघायची इच्छा झाली तर तो आपल्या घराशेजातील डीव्हीडी भाड्याने देणाऱ्या एखाद्या दुकानात जायचा. तिथे ठेवलेल्या डीव्हीडीच्या कलेक्शनमधून हवी ती डीव्हीडी निवडून ती घरी घेऊन यायचा. डीव्हीडी दुकानदारास परत करण्याची वेळ ठरलेली असायची. समजा कोणत्यातरी कारणामुळे ती परत करण्यास उशीर झाला तर अतिरिक्त शुल्क आकारली जात असे.

एकदारीड हेस्टिंग्ज नावाच्या एका इसमाने अमेरिकेत कोणती तरी एक डीव्हीडी ब्लॉकबस्टर नावाच्या दुकानात जाऊन भाड्याने घेतली. ती परत करण्यास त्याला उशीर झाला. नियमाप्रमाणे त्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागले. खरं तर हा विलंब होण्यास अनेक कारण होती पण ते महत्वाचं नव्हतं, पहिले तर दुकानात जा, डीव्हीडी घ्या, मग ती पहा, मग ती वेळेत परत करायला परत दुकानात जा, यात ग्राहकाचा खूप वेळ जात असे. 

रीड हेस्टिंग्जला त्यातून एक कल्पना सुचली. डीव्हीडी घरपोच देण्याची. चित्रपटांचे माहिती इंटरनेट द्वारे मिळवण्याची. हि नुसती कल्पना नव्हती तर त्याने लगेच या कल्पने वॉर काम चालू केलं ती कल्पना त्यांनी जोपासली, मोठी केली आणि त्यातून आजची उभी राहिली ती आज भारताच्या विडिओ स्ट्रीमिंग मध्ये धुमाकूळ घालणारी नेटफ्लिक्स.      

हेस्टिंग्जने आपल्या पार्टनर बरोबर नेटफ्लिक्स कंपनी सुरु केली. हि सर्विस वापरण्यासाठी ग्राहकाला दुकानामध्ये जाण्याची आता गरज नव्हती. त्याऐवजी तो स्वतःच्या संगणकाच्या साहाय्याने एखादी डीव्हीडी ऑनलाईन मागवू शकत असे. त्याने मागविलेली डीव्हीडी कुरिअर केली जाई. तसेच डीव्हीडी परत करण्यासाठी अतिरिक्त शुल्क नसायचे. एका वेळेस एकच डीव्हीडी ठेवण्याची मुभा असायची. ती परत केल्यावर दुसरी मागवता येणे शक्य होते.

पहिल्यांदा त्यांनी रीड हेस्टिंग्जच्या घरी डीव्हीडी कुरिअर करून तपासून बघितले कि हि सर्विस व्यवहार्य आहे कि नाही. कोणताही डॅमेज (तोडमोड) न होता डीव्हीडी घरी पोचल्यावर त्यांनी हि सर्विस सुरु करण्याचा निर्णय पक्का केला.

सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नेटफ्लिक्स कंपनी खूप छोटी होती तेव्हा त्यांनी ब्लॉकबस्टर कंपनीला भागीदारीचा प्रस्ताव दिला. पण एका छोट्या कंपनीचे भागीदार बनण्यास त्यांनी अनुत्सुकता दाखविली. पुढील काळात नेटफ्लिक्सने पूर्णतः ब्लॉकबस्टरच्या बाजारपेठेवर कब्जा केला. २०१० साली ब्लॉकबस्टर दिवाळखोर बनली.

त्याच वर्षी नेटफ्लिक्सने स्वतःची स्ट्रीमिंग सर्विस सुरु केली आणि यशस्वी वाटचाल सुरु ठेवली.

डीव्हीडी क्षेत्रातील ऍमेझॉन कंपनी बनविण्याच्या मनसुब्यातून नेटफ्लिक्सचा उदय झाला असावा असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.

जगभरात बघितल्या जाणाऱ्या व्हिडीओपैकी सरासरी ८% व्हिडीओ हे एकट्या नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म वर बघितले जातात.