न्यायवैद्यक लेखापरिक्षणामध्ये भारतात काय संधी आहेत?

  सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल हा एक महत्वपूर्ण कोर्स आहे एक आहे.

  बँकिंग सुधारणांसारख्या विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षातील फॉरेन्सिक अकाउंटंट्सच्या सेवांची व्याप्ती लक्षणीय वाढली आहे. प्रत्यक्षात काही सभासद काम करत असलेल्या क्षेत्रं बद्दल मी इथे नमूद करू इच्छितो त्यातला सर्वात महत्वाचं कार्यक्षेत्र आहे

  बँक फॉरेन्सिक ऑडिट

  बँकिंग क्षेत्रात सध्या चालू असलेल्या बऱ्याच अफ़रातफ़रीच्या घटनांमुळे, फॉरेन्सिक ऑडिटर्ससाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सहेतुक कर्जबुडवे शोधण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटच्या सेवांची मोठी मागणी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बर्‍याच बँकांना त्यांच्या कर्जदारांचे फॉरेन्सिक ऑडिट करणे आवश्यक बनले आहे. बुडलेले कर्ज हे व्यवसायात आलेल्या घाट्याने झाले आहे का जाणूनबुजून केले गेले आहे हे शोधणं महाकुटील काम असते

  दिवाळखोरी प्रकरणे

  थकबाकी भरणा न करणाऱ्या कर्जदारांवर पुढील कारवाईसाठी बँका आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलचे दरवाजे ठोठावत आहेत. यापैकी बरीच प्रकरणे दिवाळखोरी कायद्यांतर्गत दाखल केली जातात आणि दिवाळखोरी जाहीर करण्या साठी हे माहिती करणे आवश्यक आहे कि व्यवसाय तोट्यात गेला आहे ना कि तोट्यात घातला गेला आहे

  आर्थिक गुन्हे शाखा

  विशेषत: जिथे पिरॅमिड योजना, पोंझी योजना किंवा पैसे फिरवण्याचा योजनावर गुन्हे दाखल केले जातात तेव्हा क्लिष्ट आकडेमोड करण्यासाठी फॉरेन्सिक अकाउंटंट्सची गरज भासते. आर्थिक गुन्हे शाखांमध्ये फोरेन्सिक अकाउंटंट्सना त्यांच्या नुकसानीचे नेमके प्रमाण मोजण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करण्यास सांगितले जाते.

  गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय

  काही वेळा गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय कॉरपोरेट फसवणूकीच्या विविध बाबी तपासण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सची मदत घेते. अशा तपासात डिजिटल फॉरेंसिक महत्वाची भूमिका बजावते.

  सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

  शेल कंपन्या, फसव्या प्रॉस्पेक्टस अप्लिकेशन आणि अंतर्गत ट्रेडिंगच्या विरोधात झालेल्या कारवाईत भारतीय भांडवलाच्या बाजारपेठेतील सर्वात शक्तिशाली नियामकांपैकी एक असलेल्या सेबीला फॉरेन्सिक ऑडिटर्सची मदत आवश्यक असते .

  प्रमाणित फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल्सची भारतात मोठी मागणी आहे आणि भारतीय वित्तीय क्षेत्रातील सुधारणा सुरू राहिल्यामुळे फॉरेन्सिक अकाउंटिंग सर्व्हिसेसची व्याप्ती वाढणार आहे.