बेझोसची यशोगाथा – अमेझॉनचे वाढते साम्राज्य

288

अमेरिकन उद्योजक जेफ बेझोस हा अमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ चा मालक आहे. व्यवसायातील यशस्वी उपक्रमांमुळे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

कोण आहे जेफ बेझोस ?

उद्योजक आणि ई-कॉमर्स चा पाठीराखा जेफ बेझोस, ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, वॉशिंग्टन पोस्टचा मालक आहे आणि अंतराळ संशोधन कंपनी ब्लू ओरिजिनचा संस्थापक आहे. त्याच्या व्यवसायातील यशस्वी उपक्रमांमुळे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

न्यू मेक्सिकोमध्ये १९६४ मध्ये जन्मलेल्या बेझोसचे कॉम्प्युटरवर तरुण वयातच प्रेम जडले आणि त्याने प्रिन्सटन विद्यापीठात संगणक विज्ञान आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा अभ्यास केला. पदवीनंतर वॉल स्ट्रीटवर काम केले आणि १९९० मध्ये तो गुंतवणूक फर्म डी.ई. शॉ मधील सर्वात तरुण वरिष्ठ उपाध्यक्ष झाला.

चार वर्षांनंतर, बेझोसने अमेझॉन डॉट कॉम उघडण्यासाठी आपली बक्कळ पगार देणारी आकर्षक नोकरी सोडली, अमेझॉन ही इंटरनेट जगासाठी नवीन गोष्ट असतानाच इंटरनेटची सर्वात मोठी यशोगाथा ठरलेली एक ऑनलाइन बुक स्टोअर आहे. २०१३ मध्ये, बेझोसने वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतली आणि २०१७ मध्ये अमेझॉनने व्होल फूड्स घेतली.

जेफ बेझोसचे कुटुंब

जेफ बेझोस यांचा जन्म १२ जानेवारी १९६४ रोजी न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क येथे जॅकलिन गिस जोर्गेनसेन या किशोरवयीन मुलीच्या पोटी झाला, त्याचे जन्मदाते वडील, टेड जोर्गेनसेन हे होते. पुढे जरगेनसेन्सचे लग्न एका वर्षापेक्षा कमी झाले होते. जेव्हा बेझोस ४ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईने क्युबातील परदेशवासी माइक बेझोसशी दुसरे लग्न केले.

जेफ बेझोसचे शिक्षण

बेझोसने १९८६ मध्ये विशेष प्राविण्यासह प्रिन्स्टन विद्यापीठातून संगणक विज्ञान आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. गोष्टी कशा कार्य करतात याबद्दल त्याला आकर्षण होते यासाठी त्याने आपल्या पालकांचे गॅरेज प्रयोगशाळेमध्ये रुपांतर केले आणि लहानपणीच त्याच्या घराभोवती विद्युत कुंपण तयार केले.

तो किशोरवयीन असतानाच आपल्या कुटुंबासमवेत मियामीला गेला, जिथे त्याचे संगणकांबद्दल असलेले प्रेम वाढले आणि त्याने आपल्या उच्चमाध्यमिक शाळेची व्हॅलेडिक्टोरियन पदवी प्राप्त केली. उच्चमाध्यमिक शाळेत असतानाच त्याने आपला पहिला व्यवसाय, ड्रीम इन्स्टिट्यूट सुरु केली जी चौथी, पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उन्हाळी शिबिरे घ्यायची.

वित्तव्यवसायातील करिअर

प्रिन्स्टनमधून पदवी घेतल्यानंतर बेझोसला वॉल स्ट्रीटवरील अनेक फर्ममध्ये काम मिळाले, ज्यात फिटेल, बॅंकर्स ट्रस्ट आणि गुंतवणूक फर्म डी. ई. शॉ. १९९० मध्ये बेझोस डी. ई. शॉ मधील सर्वात तरुण उपाध्यक्ष झाला.

अर्थव्यवस्थेमधील त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी होत असतानाच बेझोसने ई-कॉमर्सच्या नवीन आणि तितक्याच धोकादायक जगात पाऊल टाकायचे ठरवले. १९९४ मध्ये बेझोसने नोकरी सोडली, सिएटलला राहायला गेला आणि इंटरनेटच्या बाजारातील कोणीही विचार केला नसलेला एक नवीन व्यवसाय “ऑनलाइन बुक स्टोअर” सुरु केले.

अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

बेजोसने १६ जुलै १९९६ ला अमेझॉन डॉट कॉम उघडले, अमेझॉन ही दक्षिण अमेरिकन नदी असल्याने तिचे नाव वेबसाईट ला देण्यात आले. तसेच त्याने त्याच्या ३०० मित्रांना हे साईट प्राथमिक चाचणीसाठी (बीट टेस्ट) सांगितले. सुरू होण्याच्या महिन्यांतच काही कर्मचार्‍यांनी त्याच्या गॅरेजमध्ये बेझोससह अमेझॉन डॉट कॉमसाठी संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यास सुरवात केली; अखेरीस कामाचा व्याप वाढल्यामुळे त्यांनी तीन सन मायक्रोस्टेशन्सने सुसज्ज असलेल्या दोन बेडरूमच्या घरात कार्यालय केले.

प्रारंभिक यशच छप्पर फाडके मिळाले होते. कोणत्याही जाहिरातीशिवाय, अमेझॉन डॉट कॉमने ३० दिवसांच्या आत संपूर्ण अमेरिका आणि ४५ देशात पुस्तके विकली. दोन महिन्यांत बेझोस आणि त्याच्या स्टार्टअप टीमने कल्पना केली त्यापेक्षा विक्री वेगाने वाढत होती. अमेझॉन डॉट कॉमची विक्री आठवड्यात २०००० डॉलर्सपर्यंत पोहोचली.

अमेझॉन डॉट कॉमने १९९७ मध्ये आपला व्यवसाय सूचिबद्ध केला आणि त्यांच्या समभागांची किंमत प्रति-समभाग १८ डॉलर लावण्यात आली. याच वेळी पारंपरिक किरकोळ विक्रेत्यांनी स्वत:ची ई-कॉमर्स साइट लाँच केली. पारंपरिक किरकोळ विक्रेत्यांनी स्वत: चे ई-कॉमर्स साइट लाँच केल्यावर अमेझॉन तग धरेल का असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु दोन वर्षांनंतर, अमेझॉन डॉट कॉम हे स्टार्ट-अप केवळ चालूच राहिले नाही तर प्रतिस्पर्धींपेक्षा पुढे गेला आणि तो एक ई-कॉमर्स लीडर बनला.

१९९८ मध्ये सीडी आणि व्हिडिओच्या विक्रीसह बेझोसने अमेझॉनच्या विक्री उत्पादनांमध्ये विविधता आणली, आणि नंतर प्रमुख किरकोळ भागीदारीद्वारे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी आणि बरेच काही समाविष्ट केले.

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस डॉट कॉमचा उत्साह वाढला असताना, अमेझॉनची वार्षिक विक्री १९९५ च्या ५१०००० डॉलर्सवरून २०११ मध्ये १७ अब्ज डॉलर्सवर गेली. तरीदेखील सुरुवातीला तब्बल ७ वर्षे हि कंपनी तोट्यामध्ये होती.

बेझोसच्या २०१८ च्या वार्षिक भागधारक पत्राचा एक भाग म्हणून, सुप्रसिद्ध माध्यमेदेखील म्हणाली की कंपनीच्या अमेझॉन प्राइम या सेवेने १० कोटी सशुल्क ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत अमेझॉनचे मूल्य १ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होते, ऍपलने हा विक्रम केल्याच्या काही आठवड्यांतच हा विक्रम नोंदवणारी ऍमेझॉन दुसरी कंपनी ठरली.

२०१८ च्या अखेरीस, अमेझॉनने जाहीर केले की ते आपल्या कामगारांसाठी किमान वेतन प्रति तास १५ डॉलर करीत आहे. जुलै २०१९ मध्ये प्राइम डे दरम्यान कंपनीच्या कामगारांनी विरोध दर्शविला. त्यावेळेस अमेझॉन मधील कामगारांच्या कामाची परिस्थिती आणि सेवेच्या भीषण दबावासाठी कंपनीवर टीका झाली.

अमेझॉन इन्स्टंट व्हिडिओ आणि अमेझॉन स्टुडिओ

२००६ मध्ये अमेझॉन डॉट कॉमने व्हिडिओ-ऑन-डिमांड सेवा सुरू केली. सुरुवातीला अ‍ॅमेझॉन इन्स्टंट व्हिडिओ, “टीव्हीओ” (TiVo) वर अमेझॉन अनबॉक्स म्हणून ओळखले जात असे, अखेरीस ते अ‍ॅमेझॉन इन्स्टंट व्हिडिओ म्हणून पुनरुज्जीवित केले गेले.

२०१३ मध्ये अ‍ॅमेझॉन स्टुडिओच्या प्रारंभासह बेझोसने बर्‍याच पूर्णतः नवीन मालिकांचे / चित्रपटांचे प्रक्षेपण केले. २०१४ मध्ये “ट्रान्सपरंट अँड मोझार्ट इन जंगल” या मालिकेला समीक्षकांनी डोक्यावर घेतले आणि कंपनीला याचा मोठा फायदा झाला.

कंपनीने आपला पहिला चित्रपट (दिग्दर्शक स्पाइक ली) “ची-राक” तयार केला आणि २०१५ मध्ये प्रदर्शित केला.

२०१६ मध्ये, बेझोस स्टार ट्रेक बियॉन्डमध्ये एलियन म्हणून काम करणाऱ्या कॅमियोच्या रूपाने कॅमेरासमोर उभा राहिला. बालपण पासूनचा स्टार ट्रेकचा चाहता बेझोसला आयएमडीबीवरील चित्रपटाच्या क्रेडिटमध्ये स्टारफ्लिट ऑफिशियल म्हणून सूचीबद्ध केले आहे.

२०१८ च्या सुरूवातीस, सिएटल टाईम्सने नोंदवले की अमेझॉनने आपल्या वेगवेगळ्या ग्राहक सेवांना एकत्रित केले. त्याद्वारे हा दावा करण्यात आला कि डिजिटल एंटरटेन्मेंट, अमॅझॉनची “अलेक्सा” (आभासी सहाय्यक सेवा म्हणजेच व्हर्च्युअल असिस्टंट सर्व्हिस) यासह इतर वाढत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल.

किंडल ई-वाचक

अ‍ॅमेझॉनने २००७ मध्ये किंडल नावाचा “हँडहेल्ड डिजिटल बुक रीडर” जारी केला ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांची पुस्तक निवड, खरेदी, डाउनलोड, वाचन आणि संग्रहित करण्यास एकाच साधन मिळाले.

२०११ मध्ये “किंडल फायर”च्या अनावरणानंतर बेझोसने अमेझॉनला टॅब्लेट बाजारामध्ये आणले. त्यानंतरच्या सप्टेंबरमध्ये त्याने ऍपलच्या आयपॅडला स्पर्धा म्हणून डिझाइन केलेली कंपनीची पुढची टॅब्लेटची पिढी “किंडल फायर एचडी” जाहीर केली.

एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, बेझोस म्हणाले, “आम्ही एका विशिष्ट किंमतीवर सर्वोत्कृष्ट टॅबलेट तयार केलेला नाही. आम्ही कोणत्याही किंमतीत सर्वोत्कृष्ट टॅब्लेट बनविला आहे.”

अमेझॉन ड्रोन्स

डिसेंबर २०१३ च्या सुरुवातीस, बेझोसची एक घोषणा विविध माध्यमांच्या मथळ्याचा भाग बनली ती म्हणजे “अ‍ॅमेझॉन प्राइम एअर”, या सेवेमध्ये प्रथमच छोट्या प्रमाणात का होईना परंतु ग्राहकांना डिलिव्हरी सेवा देण्यासाठी “ड्रोन”चा वापर करण्यात आला.

बेझोसच्या म्हणण्यानुसार, हे ड्रोन अडीच किलो वजनाच्या वस्तू वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि एका खेपेस १५ किमी प्रवास करू शकतात. बेझोस म्हणाला “प्राईम एअर” चार ते पाच वर्षांतच वास्तवात येऊ शकते.

फायर फोन

कंपनीने २०१४ मध्ये फायर फोन लॉन्च केला आणि अ‍ॅमेझॉनच्या काही प्रमुख फोल ठरलेल्या संकल्पनांमध्ये फायर फोन ची भर पडली. समीक्षकांनी खूपच खराब दर्जा असल्याबद्दल टीका केली आणि पुढच्या वर्षी फायर फोन बंद करण्यात आला.

होल फूड्स

बेझोस फूड डिलिव्हरी मार्केटवर लक्ष ठेवून होते आणि २०१७ मध्ये अ‍ॅमेझॉनने घोषित केले की त्यांनी १७ अब्ज डॉलर्सची व्होल फूड्स ही किराणा मालाची साखळी विकत घेतली. कंपनीने अ‍ॅमेझॉन प्राइम ग्राहकांना निवडक भागांमध्ये स्टोअर डील आणि दोन तासांत वितरण सेवा देण्यास सुरवात केली. परिणामी, वॉलमार्ट आणि क्रॉगरने देखील आपल्या ग्राहकांना तशीच सेवा देण्यास सुरवात केली.

वॉशिंग्टन पोस्टचा मालक

५ ऑगस्ट २०१३ रोजी, बेझोसने वॉशिंग्टन पोस्ट आणि त्याच्या मूळ कंपनीशी संबंधित इतर प्रकाशने २५ कोटी डॉलर्समध्ये खरेदी केली तेव्हा जगभरातील माध्यमांचे लक्ष या बातमीकडे वेधले गेले.

या करारामुळे ग्रॅहम कुटुंबाच्या पोस्ट कंपनीवरील चार पिढ्यांच्या कारकिर्दीचा शेवट झाला. त्यामध्ये कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी डोनाल्ड ई. ग्रॅहम आणि त्यांची पुतणी, कॅथरीन ग्राहम यांचा समावेश होता.

“पोस्ट कंपनीच्या मालकीखाली टिकू शकली असती आणि झालं तर ते नजीकच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतं,” ग्रॅहमने व्यवहाराचे स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात म्हटले आहे. “पण आम्हाला जगण्यापेक्षा आणखी काही करायचे होते. मी हे (पोस्ट) यशाची हमी देत नाही असे म्हणत आहे, परंतु या व्यवहारामुळे आम्हाला यशाची अधिक संधी मिळते आहे.”

५ ऑगस्ट रोजी पोस्ट कर्मचार्‍यांना दिलेल्या निवेदनात, बेझोसने लिहिलेः

“पोस्टची मूल्ये बदलण्याची गरज नाही. येत्या काही वर्षांमध्ये नक्कीच द पोस्टमध्ये बदल होईल. ते आवश्यक आहे आणि हे बदल नवीन मालकीसह किंवा त्याशिवाय झाले असतेच. इंटरनेट समाचार व्यवसायाच्या जवळजवळ प्रत्येक घटकाचे रूपांतर करीत आहे जसे की, बातमीची चक्रे कमी करणे, दीर्घ-विश्वासार्ह महसूल स्त्रोतांना कमी करणे आणि नवीन प्रकारची स्पर्धा सक्षम करणे, ज्यापैकी काही बातमी गोळा करण्यास कमी किंवा शून्य खर्च करतात.”

बेझोसने शेकडो पत्रकार आणि संपादकांची नेमणूक केली आणि वृत्तपत्राच्या तंत्रज्ञानाच्या कर्मचार्‍यांना तिप्पट केले (त्या शेकडो कर्मचार्‍यांनी २०१८ च्या उन्हाळ्यात पगाराच्या वाढीसाठी आणि अधिक चांगले फायदे विचारण्यासाठी त्यांच्या बॉसला एक मुक्त पत्र प्रकाशित केले). माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी रशियन्सशी असलेल्या त्याच्या संपर्काबद्दल खोटे बोलल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, यासह या संघटनेने अनेक घोटाळे उघड केले.

२०१६ पर्यंत ही संस्था फायद्याचे असल्याचे सांगितले गेले. पुढच्या वर्षी, पोस्टची जाहिरात कमाई १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त होती, तीन सलग वर्षांमध्ये कमाईची वाढ दोन-अंकी राहिली. कॉमस्कोरच्या म्हणण्यानुसार जून २०१९ पर्यंत अमेझॉनने ८.६४ कोटी वापरकर्त्यांसह न्यूयॉर्क टाइम्स डिजिटलला मागे सोडले.

जेफ बेझोस आणि ब्लू ओरिजिन

२००० मध्ये, बेझोसने ब्लू ओरिजिन या एरोस्पेस कंपनीची स्थापना केली, जी अंतराळ प्रवासाची किंमत कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करते ज्याद्वारे पैसे भरू शकणाऱ्या हौशी पर्यटकांना देखील अंतराळ प्रवास करता यावा. गेल्या दीड दशकापर्यंत ब्लु ओरिजिन शांतपणे काम करत होती.

त्यानंतर, २०१६ मध्ये, बेझोसने पत्रकारांना सिएटलच्या अगदी दक्षिणेस कॅंट, वॉशिंग्टन येथील मुख्यालयाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले. त्याने मानवाला फक्त अंतराळ प्रवासाबद्दलच नाही तर अंतराळ वसाहत बनवण्याची महत्वाकांक्षा बोलून दाखवली. २०१७ मध्ये, बेझोसने ब्लू ओरिजिनला निधी देण्यासाठी वार्षिक सुमारे १ अब्ज डॉलर्सचे अमेझॉनचे समभाग विक्री करण्याचे वचन दिले.

दोन वर्षांनंतर, त्याने ब्लू ओरिजिन हे चंद्रावर उतरू शकणारे वाहन सादर केले सांगितले की कंपनी त्याच्या निम्न-अंतराळकक्षात (सब-ऑर्बिटल स्पेस) जाऊ शकणाऱ्या न्यू शेफर्ड रॉकेटची चाचणी उड्डाणे घेत आहे, जे पर्यटकांना काही मिनिटांसाठी अंतराळात घेऊन जाईल.

“आम्ही एक असा अंतराळात मार्ग तयार करणार आहोत ज्याद्वारे अनेक आश्चर्यकारक गोष्टी भविष्यात घडतील, ”बेझोस म्हणाले.

ऑगस्ट २०१९ मध्ये, नासाने घोषित केले की चंद्र आणि मंगळावर पोहोचण्यासाठी १९ तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांवर सहकार्य करण्यासाठी निवडलेल्या १३ कंपन्यांमध्ये ब्लू ओरिजिनची निवड झाली आहे. ब्लू ओरिजिन चंद्रासाठी एक सुरक्षित आणि अचूक लँडिंग सिस्टम तसेच द्रवरूप इंधन असलेल्या रॉकेटसाठी इंजिन नोजल विकसित करीत आहे तसेच नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर जवळच नूतनीकरण केलेल्या कॉम्प्लेक्समधून पुनर्वापर करता येण्याजोगे रॉकेट तयार करण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी नासाबरोबर काम करत आहे.

जेफ बेझोसची संपत्ती आणि पगार

ऑगस्ट २०१९ पर्यंत, ब्लूमबर्ग आणि फोर्ब्स या दोन संस्थांनी बेझोसची एकूण मालमत्ता ११० अब्ज डॉलर्स किंवा सरासरी अमेरिकन घरगुती उत्पन्नाच्या १.९ अब्ज पटींपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले. फोर्ब्सच्या २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये बेझोस अव्वल स्थानावर आहे.

बेझोसने 1998 पासून दरवर्षी अमेझॉनमधून ८१८४० डॉलर्स इतका पगार मिळविला होता आणि कधीही पुरस्काररूपी समभाग (स्टोक अवॉर्ड) घेतलेले नाहीत. तथापि, त्याच्या जवळील अमेझॉनच्या समभागांमुळे तो खूप श्रीमंत माणूस झाला. बेझोसच्या२०१८ च्या स्टॉक कमाईच्या एका विश्लेषणामुळे तो दररोज अंदाजे २६ कोटी डॉलर घरी घेऊन जात होता.

ब्लूमबर्गच्या मते, जुलै २०१७ मध्ये, बेझोसने अगदी थोडक्या काळासाठी प्रथम क्रमांकावर असलेल्या बिल गेट्सला मागे टाकले आणि प्रथम क्रमांकावरचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आणि काही दिवसातच पुन्हा क्रमांक २ वर गेले. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार जानेवारी २०१८ मध्ये बेझोसने १०५.१ अब्ज डॉलर्सची कमाई करून गेट्सच्या मागील संपत्तीच्या विक्रमाची बरोबरी केली.

परंतु महागाई-समायोजित अटींनुसार, १९९० च्या उत्तरार्धात गेट्स बेझोसपेक्षा श्रीमंत होते. अमेरिकन व्यवसायातील “भीम” असलेल्या जॉन रॉकफेलर, अँड्र्यू कार्नेगी आणि हेन्री फोर्ड यांचे वैभव देखील बेझोसच्या संपत्तीपेक्षा जास्त होते.

बेझोस डे वन फंड

२०१८ मध्ये, बेझोसने बेझोस डे वन फंड सुरू केला, ज्यामध्ये “बेघर कुटुंबांना मदत करणार्‍या अस्तित्त्वात असलेल्या ना-नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थांना वित्तपुरवठा करणे आणि कमी उत्पन्न असलेल्या समुदायात नवीन, ना-नफा तत्वावर चालणाऱ्या प्राथमिक स्तरावरील शाळा-पूर्व (प्री-स्कुल) संस्थांचे जाळे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.” बेजोसने आपल्या ट्विटरच्या अनुयायांना त्याच्या संपत्तीचा काही भाग कसा दान करावा असे विचारल्याच्या एका वर्षानंतर ही घोषणा करण्यात आली.

घटस्फोटाच्या आधी बेजोसने आपली माजी पत्नी मॅकेन्झी यांच्यासमवेत संघटनेची स्थापना केली आणि ना-नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थांसाठी निधी म्हणून त्याने २० लक्ष डॉलर्सची वैयक्तिक देणगी दिली. बेझोसवर पूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनदेखील सामाजिक कामांमध्ये सढळ हातांनी मदन न केल्यामुळे जाहीरपणे टीका केली गेली होती.

आरोग्यसेवेतील उपक्रम (हेल्थकेअर व्हेंचर)

३० जानेवारी, २०१८ रोजी अमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन चेस यांनी एक संयुक्त घोषणा केली ज्यात त्यांनी त्यांच्या अमेरिकन कर्मचार्‍यांसाठी नवीन आरोग्य सेवा कंपनी तयार करण्यासाठी त्यांच्या संसाधनांचा विचार करण्याची योजना जाहीर केली.

घोषणेनुसार, कंपनी “नफा कमावणाऱ्या गोष्टी जसे प्रोत्साहन कार्यक्रम (इन्सेन्टिव्ह प्रोग्राम) व त्या प्रकारच्या अडचणींपासून मुक्त” असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून, खर्च कमी करण्याचा आणि रूग्णांच्या समाधानास महत्व देणारे मार्ग शोधण्याचा प्रयत्न होईल.

बेझोस म्हणाले, “आरोग्य सेवा जटिल आहे आणि आम्ही या आव्हानामध्ये सर्व अडचणी डोळ्यासमोर ठेवून प्रवेश करतो आहे, हे जितके कठीण असेल तितकेच आरोग्यसेवेचा अर्थव्यवस्थेवरील भार कमी करतानाच कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करणे महत्वाचे ठरेल.”

जेफ बेझोसची माजी पत्नी आणि मुले

डी. ई. शॉ मध्ये काम करतानाच तेव्हा बेजोस आणि मॅकेन्झी टटल यांची भेट झाली. बेझोस वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून आणि तिच्या लेखन करिअरसाठी हातभार लागावा म्हणून मॅकेन्झी प्रशासकीय सहाय्यक म्हणून काम करत होती. तीन महिने प्रेम प्रकरण चालल्यानंतर लगेचच १९९३ त्यांनी लग्न केले.

मॅकेन्झी अमेझॉनच्या स्थापनेचा आणि यशाचा अविभाज्य भाग होती, मॅकेन्झीने अमेझॉनची पहिली व्यवसाय योजना तयार करण्यात मदत केली आणि कंपनीचे पहिले अकाउंटंट म्हणून काम केले. शांत आणि पुस्तकवेडी असूनही तिने अ‍ॅमेझॉन आणि तिच्या नवऱ्याला जाहीरपणे साथ दिली. प्रिन्सटन युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजच्या काळात टोनी मॉरिसनकडे व्यापाराचे प्रशिक्षण घेतलेली कादंबरीकार, मॅकेन्झीने २००५ साली तिचे पहिले पुस्तक ‘दि टेस्टिंग ऑफ ल्यूथर अल्ब्राइट’ प्रकाशित केले आणि तिची दुसरी कादंबरी “ट्रॅप्स” २०१३ मध्ये प्रकाशित झाली.

लग्नाच्या २५ वर्षांहून अधिक काळानंतर, जेफ आणि मॅकेन्झीने २०१९ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या निकालाचा एक भाग म्हणून, अमेझॉनमधील जेफची हिस्सेदारी जवळपास ११० अब्ज डॉलर्स इतकी कमी झाली आणि मॅकेन्झीकडे ३७ अब्ज डॉलर्सइतकी हस्तांतरित झाली. मॅकेन्झीने जाहीर केले “किमान अर्धी संपत्ती धर्मादाय संस्थांना देण्याची तिची योजना आहे”.

जेफ आणि मॅकेन्झी यांना एकत्र चार मुले आहेत: तीन मुलगे आणि एक मुलगी जी चीन मधून दत्तक घेण्यात आलेली आहे.

लॉरेन सान्चेझशी संबंध

जानेवारी २०१९ मध्ये बेझोसने मॅकेन्झीपासून घटस्फोट जाहीर केल्याच्या ठीक नंतर, नॅशनल एन्क्वायररने टेलिव्हिजन होस्ट लॉरेन सान्चेझ यांच्याबरोबर बेझोसचे विवाहबाह्य संबंध असल्याचे उघडकीस आणले आणि प्रकाशित केले. त्यानंतर बेझोसने नॅशनल एन्क्वायरर आणि त्याची मालक कंपनी अमेरिकन मीडिया इनकॉर्पोरेटेड ( एएमआय ) च्या हेतूंचा तपास सुरु केला. त्यानंतरच्या महिन्यात मीडियमवरील एका प्रदीर्घ पोस्टमध्ये, बेझोसने एएमआयवर आरोप केला की त्याने तपास मागे न घेतल्यास त्या दोघांचे खाजगी अप्रसिद्ध फोटो प्रकाशित करण्याची धमकी एएमआयने दिली.

बेझोसने लिहिले, “अर्थात मी वैयक्तिक फोटो प्रकाशित करू इच्छित नाही, परंतु मी त्यांच्या ब्लॅकमेल, राजकीय पक्षपातीपणा, राजकीय हल्ले आणि भ्रष्टाचाराच्या कार्यपद्धतीचा भाग होणार नाही.” “मी त्यांविरुद्धउभे राहणे पसंत करेन आणि त्यांना उघडे पाडून काय होते ते पहाणे पसंत करेन.”