मीरा भाईंदर कॉल सेंटर घोटाळा नक्की कसा घडला ?

2826

मुंबई मधील मीरा रोड येथे चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काही वेगळच काम चालायचं. अमेरिकेतील नागरिकांना फोन करून आयकर ना भरल्या बद्दल धमकी देण्याचं. इंटर्नल रेव्हेन्यू सर्विसमधून (अमेरिकेतील आयकर खाते) फोन करत असल्याचे सांगून येथील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना गंडा घालायचे. या सर्व प्रकरणाचा सूत्रधार होता सागर ठक्कर.

ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे किंवा ज्यांनी कर भरलेला नाही अशा अमेरिकन लोकांना ठाण्यातील कॉल सेंटरमधून कॉल जात असे. हा कॉल अमेरिकन सरकारकडून आला असल्याचे त्यांना भासवले जात असे. हे कॉल्स करायला या कंपनी कडे भारतातून अमेरिकेत गेलेल्या अथवा इतर देशातून अमेरिकेत गेलेल्या लाखो लोकांबद्दल वैयक्तिक माहिती उपलब्ध होती, तुम्हाला देशा बाहेर काढण्यात येईल किंवा तुम्हाला अटक होईल अशी धमकी दिल्या नंतर धांदरलेल्या माणसाला बँकेचे डिटेल्स मागितले जात असत आणि काही वेळात या अमेरिकेतील मंडळींच्या बँकेच्या खात्यातून रक्कम गायब होत असे. हा सगळं प्रकार ३०० दश लक्ष अमेरिकन डॉलर्स इतका प्रचंड असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता

त्यातून सागरच्या बनावट कंपनीने ५०० कोटी रुपये कमवले होते. सागर ठक्कर उर्फ शॅगीने क्रिकेटपटू विराट कोहलीकडून ऑडी आर-८ ही गाडी विकत घेऊन आपल्या प्रेयसीला भेट दिली होती. मात्र ‘या प्रकरणाचा विराट कोहलीशी काही संबंध नव्हता. विराटला या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपये इतकी होती.

पोलिसांना या गोष्टीची खबर लागताच सागर दुबईला पळून गेला. परंतु संयुक्त अरब अमिरातीने त्याल दुबईमध्ये अटक करून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करून दुबईला पळून गेलेल्या सागरला त्याच्या प्रत्यार्पणानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांनी मुंबईस आणले आणि अटकेत टाकले.

सागर ठक्करचा जन्म मुंबईचे उपनगर असलेल्या बोरिवलीत एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यानंतर तो अहमदाबादला गेला होता. याच ठिकाणी तो बोगस कॉल सेंटर चालवण्याचे तंत्र शिकला.

आधीच कॉल सेंटर या व्यवसायाकडे काही फार चांगला दृष्टिकोन ठेवून पाहिलं जात नाही त्यात अशा घटनांनी देशातल्या संपूर्ण व्यवसायाकडे पाहायचा जागतिक दृष्टिकोन खराब करायचे काम मात्र या घोटाळ्याने केले हे निश्चित