भारतातले युनिकॉर्न स्टार्टअप

1147

स्टार्टअप मधील व्यावसायिकांना खास करून मराठी स्टार्टअप्सना युनिकॉर्न स्टार्टअप ही फारशी परिचित संज्ञा नाही.  २०१३ मध्ये ऐलीन ली नावाच्या एका व्हेंचर कॅपिटॅलिस्ट मॅडमने न्यूयॉर्क टाईम्स मध्ये लिहलेल्या एका सदरात सर्व प्रथम ही संज्ञा वापरली. तेव्हा पासून गुंतवणूक जगतामध्ये ज्या खाजगी कंपनीच बाजार मूल्य १०० कोटी डॉलर्सच (म्हणजेच साधारण ६५०० कोटी रुपयांच बाजार मूल्य), आकडा पार करतात त्यांना युनिकॉर्न म्हंटले जाते.

अनेक शेयर बाजारात सूचित झालेल्या कंपन्यांच पण बाजार मूल्य  हा आकडा पार करू शकत नसतील पण या खासगी, भांडवल बाजारात नोंदणी ना झालेल्या कंपन्या हे मूल्य पार करतात आणि केवळ पारच करत नाहीत तर या मूल्य प्रमाणे गुंतवणूकदारां कडून व्यवसाय साठी भांडवल पण उभे करतात . नवीन नवीन चालू झालेल्या कंपनीने खाजगी राहून एवढ बाजार मूल्य गाठणे ही काही सोपी गोष्ट नसते.

आज मितीला भारतात केवळ १२ युनिकॉर्न आहेत. फ्लिपकार्ट, पेटीएम, ओला, झोमॅटो, इन्मोबी, स्वीगी, बायजु, रिन्यू पॉवर, शॉपक्लूज, क्विकर, हाईक आणि पोलिसीबझार या त्या १२ यशस्वी कंपन्या आहेत ज्यात आज अनेक गुंतवणूकदार पैसे लावत आहेत आणि त्यांचे पैसे कित्येक पटीने वाढवत आहेत.

या युनिकॉर्न सोबतच सुनिकॉर्न नावाची पण संज्ञा प्रसिद्ध होऊ लागली आहे, सुनिकॉर्न म्हणजे अशा कंपन्या ज्यांचा बाजारमूल्य अजून ६५०० कोटी झालेलं नाही पण त्या कंपन्यांची वाटचाल पाहता लवकरच त्या हा आकडा पार करतील याची आश्वासक शाश्वती अजून सहा कंपन्यांना पाहून वाटते त्या आहेत बिग बास्केट, रिव्हिगो, ओयो, देल्हीवरी, फ्रेश्वर्क्स आणि बुकमायशॊ.

या कंपन्यांचं मूल्यांकन प्रक्रिया खूप किचकट असते, या कंपन्या नोंदणीकृत नसल्यामुळे मागणी आणि पुरवठा या कंपन्यांचं समभागांचे मूल्यांकन ठरवत नाही तर गुंतवणूकदाराला कंपनी मध्ये किती पैसे टाकायचे आहेत, त्याच्या बदल्यात किती समभाग त्याला हवे आहेत, पुढील काही दिवसात या गुंतवणुकीमुळे व्यवसायात किती वाढ होणार आहे आदी गोष्टी समभागांची किंमत ठरवतात. अशा वेळेस स्वतःची बोली साडेसहा हजार कोटी रुपयांच्यावर लावून गुंतवणूक उभी करणे हि अडथळ्याची शर्यत या कंपन्या पार पडत असतात आणि म्हणूनच त्यांना स्टार्टअप्सच्या जगतात महत्व आहे.