राजकीय हेतूने प्रेरित व्यावसायिकाची शोकांतिका

1690

व्ही जि सिद्धार्था यांची आत्महत्या मनाला रुखरुख लावून गेली. त्यांना कर दहशतवादाचा सामना करावा लागला असे जरी क्षणभर मान्य केले तरी ते राजकीय हेतूने प्रेरित व्यावसायिक होते हे विसरून चालणार नाही आणि म्हणूनच त्यांची आत्महत्या हि राजकीय हेतूने प्रेरित व्यावसायिकाची शोकांतिका म्हणता येते. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजप मध्ये मुक्कामी असलेले एसएम कृष्णा हे सिद्धार्थ यांचे सासरे. सिद्धार्था यांची बायको मालविका हेगडे या एसेम कृष्णा यांच्या जेष्ठ कन्या. त्यांच्या अवघ्या आयुष्यात त्यांनी कधीच आपल्या सासऱ्यांशी व्यवसायाबद्दल चर्चा केलीच नसेल असे जरी गृहीत धरले तरी आज याच राजकीय हेतूने प्रेरित व्यवसायामुळे बँक अडचणीत आल्या आहेत. 

यांनी लिहलेल्या पत्रावरून असे लक्षात येते कि त्यांच्यावर खासगी गुंतवणूकदार (पीई) समभाग पुनर्खरेदी साठी प्रचंड दबाव आणत होते, मित्रांकडून पैसे उचल करून त्यांनी शेवटी समभाग खरेदी केली सीसीडी मध्ये तीन गुंतवणूकदार आहेत – केकेआर, रिव्हेंडेल पीई (पूर्वी न्यू सिल्क रूट) आणि अफार्म कॅपिटल, जे स्टँडर्ड चार्टर्ड पीईचा पोर्टफोलिओ सांभाळतात. केकेआरचा 6.07% हिस्सा आहे, तर जून 2019 पर्यंत कॅफे कॉफी डेमध्ये रिवेंडेल आणि अफार्मचे अनुक्रमे 10.61% आणि 5.67% आहे, असे स्टॉक-एक्सचेंजच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

याच पत्रात दिलेले दुसरे कारण म्हणजे आयकर अधिकाऱ्यांनी माईंड ट्री मधील समभाग एल अँड टी ला विकण्यासाठी दिलेला त्रास. याच पत्रात असा म्हंटलं आहे कि माईंड ट्री मधील समभाग विकताना सीसीडीचे समभाग आयकर अधिकाऱ्याने जप्त करून टाकलेले

पण गुंतवणूकदारांचा दबाव काय किंवा आयकर अधिकाऱ्याने दिलेला त्रास काय हे काही एवढ्या टोकाला जाऊन कृती करण्या मागचा कारण असू नाही शकत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला आयपीओ काढण्यापासून रोखणाऱ्या अल्गो ट्रेडिंग घोटाळ्यांमधून जो माणूस सही सलामत बाहेर पडू शकतो तो एवढ्या छोट्या घटनांना बळी पडेल असे म्हणणे हा पोरकट पणा ठरेल.

या सर्व प्रकरणात खालील काही गोष्टी विचार करण्या सारख्या आहेत

  1. सिद्धार्थला घेऊन जाणाऱ्या कार चालकाने सांगितलेली कथा पोलीस कितपत ग्राह्य धरतात यावर पुढचा शोध अवलंबून आहे. त्याने कुठेही असं म्हंटलेलं नाही कि सिद्धार्थने नेत्रावती नदी मध्ये उडी मारली आहे. जरी तपस या दिशेने चालू असला तरी घातपाताची शक्यता पण गृहीत धरली पाहिजे.
  2. दिवस अखेर आयकर विभागाने सिद्धार्थच्या शेवटच्या पत्राची वैधताच नाकारली आहे, वार्षिक अहवालावरची सही आणि या पत्रावरची सही पण खास सारखी वाटत नाही. त्यामुळे आता तपास खर तर हे पत्र नक्की कोणाला लिहलेलं, ते कोणाकोणाला मिळालेलं आणि नक्की कोणत्या बोर्ड सदस्याने ते जाहीर केलं हे पाहणं आता फार महत्वाचं ठरेल.
  3. माईंडट्री मधले २०% समभाग जेव्हा सिद्धार्थने एल अँड टी ला जेव्हा विकले तेव्हा माईंडट्रीचे अस्तित्वच पणाला लागले, एल अँड टी च्या हातात आयतेच कोलीत मिळाले, एल अँड टी सोबतच्या लढाई मध्ये मूळ प्रवर्तकांनाच कंपनीचा ताबा गमवायला लागला आणि हि सगळी लढाई मीडिया मधून लढली गेली. या सगळ्या गोष्टींनी प्रवर्तकांना सिद्धार्थचा राग आला नसेलच याची खात्री देता येत नाही.
  4. एसेम कृष्णा हे मूळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सध्या भाजपा मध्ये आहेत आणि आत्ताच कर्नाटकात जे सत्तांतर झाले त्यात काँग्रेस ला सत्ता गमवावी लागली. काँग्रेसच्या एका आमदारांनी दावा केला आहे कि सिद्धार्थ ने त्यांना कालच फोन केलेला हे सांगायला कि व्यवसायात तो अपयशी ठरला आहे. कर्नाटकात राजकीय नाट्य घडत असताना सिद्धार्थ सारखा मुरलेला व्यावसायिक राजकीय समज नसलेला असेल अस मानणं अगदीच बालिशपणा ठरेल.