रोल्स रॉइसच्या भ्रष्टाचाराची कथा

  रोल्स रॉइस म्हंटल  की आपल्या डोळ्यासमोर येते  ती एक लांबलचक गाडी, श्रीमंतांची गाडी जी भारतात फक्त ३ लोकांकडेच आहे – मुकेश अंबानी, भूषण कुमार आणि अजय देवगण. सात कोटी रुपयांची गाडी  म्हणून भारतात रोल्स रॉइस आपल्याला माहिती असते पण हे फार कमी लोकांना माहिती असते की याच नावाची अजून एक ब्रिटिश कंपनी विविध देशांच्या सुरक्षा उपकरणात लागणारे इंजिन पण बनवते. 

  गेल्या काही वर्षांपासून ब्रिटन स्थित सिरीयस फ्रॉड ऑफिस रोल्स रॉइस पीएलसी या कंपनीची जगभरात त्यांनी ७ देशात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत होत पण ती चौकशी थांबवावी म्हणून या कंपनीने ५० कोटी पौंडाचा दंड भरला. याच प्रकरणात केपीएमजी या बड्या ऑडिट कंपनी ची पण चौकशी झाली, इंडोनेशिया मध्ये याच कंपनीवर गरुड इंडोनेशिया ने खटला देखील भरला. कझाकिस्थान मध्ये या कंपनीने पुनर्विक्रेते घेताना राजकीय हितसंबंध असलेलेच घेतले आणि त्यांच्या द्वारे लाचेची रक्कम राजकारण्यांपर्यंत पोचला आहे.     

  सुधीर चौधरी

  चौकशी दरम्यान सुधीर आणि भानू चौधरी यांना काही दिवस स्थानबद्ध केले होते पण नंतर त्यांना सोडून दिल गेलं. सुधीर चौधरी हा भारतात कुख्यात असलेला शस्त्रास्त्रांचा दलाल, २००७ साली झालेल्या बराक मिसाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणात देखील त्याचे नाव आलेले. नंतर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात देखील त्याचे नाव गोवण्यात आलेले.  

  त्याने रोल्स रॉइसला या भ्रष्टाचारात मदत केली असं मानलं जात होत पण कालांतराने या कंपनीला दंड करून सिरीयस फ्रॉड ऑफिस ने माफ केलं आणि या दोघांना पण सोडून दिल. सुधीर चौधरी हा भारतीय असला तरी त्याने जगभरात अनेक राजकारण्यांना शस्त्रास्त्रांच्या खरेदी व्यवहारात लाच दिली असल्याचे समोर येत आहे.

  ब्रिटन मधल्या लिबरल डेमोक्रॅट पक्षाला त्याने १५ लाख पौंडाच्या देणग्या दिल्या आहेत. इस्राएल मध्ये तर याला एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचा दर्जा आहे आणि या देशात त्याच्या बद्दल सहजपणे वर्तमानपत्रात काहीच लिहायला परवानगी नाही. सिरीयस फ्रॉड ऑफिसच्या चौकशी दरम्यान ब्रिटनला लक्षात आले की या कंपनीने भारतात देखील व्यवसाय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच दिली आहे.

  याच करणास्तवव त्यांनी सीबीआयला या प्रकरणात लक्ष घालायला लावलं. एच.ए.एल , गेल आणि ओएनजीसी यांच्याकडून कंत्राट प्राप्त करण्यासाठी एजंटला कमिशन म्हणून 77 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असल्याचा आरोप या कंपनीवर ठेवला गेला आहे. इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे सुधीर चौधरीची पार्श्वभूमी. याचे काका बलजित कपूर हे २०१३ पर्यंत एच.ए.एल या कंपनीचे अध्यक्ष होते.आणि त्यांच्याच वरदहस्ताने सुधीर अनेक राजकीय आणि प्रशासकीय लोकांपर्यंत पोचला.  

  हा व्यवहार 2007 ते 2011 या काळात पार पडला असल्याचे समोर येत आहे. या शिवाय अशोक पटनी या एका सिंगापूर स्थित दलालाने १८ कोटी रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. 

  यावर्षी जुलै महिन्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) यांच्याकडून एफआयआर दाखल झाल्यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने प्रेव्हेंशन ऑफ मनी लॉण्डरिंग कायद्याच्या   तरतुदीखाली हा खटला दाखल केला आहे.