विजय मल्ल्या बँकांना का खुपला ?

प्रचंड खर्चिक जीवन शैली असलेला विजय मल्ल्या हा डोळ्यात खुपतो पण इतर कर्ज बुडवे बरेचदा माहित पण नसतात

608

विजय मल्ल्या हा एक उत्कृष्ट उदाहरण आहे राजकीय हेतूने प्रेरित व्यक्तीच. राजकीय हेतूने प्रेरित व्यक्ती ज्यांना पीईपी असा संबोधलं जाते हे कायमच बँकांसाठी डोके दुखी राहिलेली आहे. राजकीय व्यक्तीला कर्ज देऊ नये असा कोणी सांगत नाही पण राजकीय कर्जाची परत फेड हि कायमच होते असं नाही, त्याचाच परिपाक म्हणजे विजय मल्ल्याच्या अध्याय

२००५ साली मुलाखतीसाठी बंगलोरला जायचा योग आलेला तेव्हा पहिल्यांदा मी किंगफिशर काय आहे ते पाहिलं. इकॉनॉमी तिकिटांवर किंगफिशर एअरलाइन्स ज्या प्रकारची सेवा देत होती, ती जेट एअरवेज खूप जास्त पैसे घेऊन देखील पुरवत नव्हती.

जेव्हा विजय मल्ल्या यांनी एअर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट व्यवसायात प्रवेश केला तेव्हा श्री. मुकेश अंबानी यांनीही हवाई प्रवासी व्यवसायात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याची अफवा होती आणि त्यांनी कॅप्टन गोपीनाथ यांच्या एअर डेक्कन कंपनीचा ताबा मिळवण्यात रस दर्शविला होता. विमान क्षेत्र असो किंवा क्रिकेट असो मल्ल्याने स्पर्धा केली ती भारतातल्या सर्वात श्रीमंत माणसांसोबत.

मुकेश अंबानी यांनी एअर डेक्कनच्या विमानवाहिन्यांचा ताबा घेण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठी विजय मल्ल्या यांनी एअर डेक्कन योग्य मूल्यांकन न करता विकत घेऊन टाकले.

विजय मल्ल्या यांनी आपले एअरलाइन्स कर्मचारी, पायलट्स, एअर होस्टेसेस, कारभारी, विमान देखभाल अभियंता आणि इतर सहाय्यक कर्मचारी इतर एअरलाईन्सच्या तुलनेत भरमसाठ पगारावर घेतले होते.

इकॉनॉमी रेटच्या भाड्याने पूर्ण सेवा देणे, जेवण समाविष्ट करणे, यशस्वी व्यवसाय मॉडेल बनलाच नाही

विजय मल्ल्याचे मद्य व्यवसायाचा सम्राट होते, जेथे नफ्याचे प्रमाण मोठे होते आणि खात्याच्या पद्धती कठोर नव्हत्या. एअरलाइन्सच्या व्यवसायातही तीच पद्धत आणल्यावर व्यवस्थापकांकडे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याचा अधिकार आले.

हे मॉडेल मद्य व्यवसायामध्ये टिकू शकते जिथे मार्जिन खूप मोठे आहे परंतु पातळ मार्जिनवर चालणार्‍या हवाई-प्रवासाच्या व्यवसायात ते यशस्वी नाही ठरले .

खरं सांगायचं तर विजय मल्ल्या हा एक मोठ्या बापाच लाडावलेलं कार्ट होतं, कंपनी मध्ये मिटींग्सला ना जाणार, राज्यसभेत हजेरी ना लावता पार्ट्या करणार आचरट कार्ट.

गोव्यातील आपला वाढदिवस सार्वजनिक स्टाईलमध्ये साजरा करणे आणि आपल्या पाहुण्यांना परदेशातून बोलावणे हे सगळे चाळे लोकांच्या नजरेत आले. त्या नंतर त्याचे मॉडेल्स सोबतचे फोटो, त्याची लग्न, त्याच्या मुलाचे दीपिका पदुकोण सोबतचे संबंध या सगळ्या नको त्या गोष्टींमुळे तो चर्चेत राहिला पण हे करत असताना त्याला एक गोष्ट लक्षात नाही आली कि सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची कर्ज न फेडता तो हे सगळे धंदे करत होता

विजय मल्ल्या हा कुटिल नव्हता त्याला दिखावा करायला आवडायचं, बातम्यात यायला आवडायच विचार करा आपल्या पैकी कोणी कधी रोटोमॅक इंडस्ट्रीजचे श्री. विक्रम कोठारी यांच्यावर नाराज आहे का ज्यांचेकडे भारतीय बँकांचे सुमारे ८००० कोटी रुपयांचे कर्ज आहे?

आपल्यापैकी बहुतेकांना हेही माहिती नसते की विक्रम कोठारी कोण आहेत किंवा बँकांवर त्यांचे किती मोठे कर्ज आहे. कोठारी कधीच नजरेत नाही आला, पण पैशाची उधळण करून त्याने असलेली संपत्ती आणि साम्राज्य लयास नेलं. तांत्रिक दृष्ट्या त्याला फरार घोषित केला आहे पण जर तो पैसे देत असेल तर ते घ्यायला काय हरकत आहे, घोटाळेबाजांचा इतिहास बघता मला नाही वाटत कधी कोणत्या घोटाळे बाजाने बँकांना पैसे परत केले आहेत