विषाणू आणि जिवाणूंची जननी चीन

203

सध्या जगभरात उच्छाद मांडणाऱ्या करोना व्हायरसचा जन्म हा मुळात चीनमधल्या वूहान शहरातला. जगात  निर्माण झालेल्या भयंकर विषाणूं पैकी अनेक विषाणू हे चीन मध्येच जन्माला येतात. 

इबोला, एड्स माकडांपासून माणसामध्ये आले, बर्ड फ्लू पक्षांपासून, कोरोना प्राण्यांपासून, असे अनेक रोग हे प्राण्यांच्या वाटे माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकले. पण हे इतरत्र उत्पन्न होणारे सगळे विषाणू मानव जाती पर्यंत कसे काय पोहचू शकतात याचं केवळ एकच उत्तर आहे – चिनी लोकांच्या खायच्या सवयी. हलणारा प्रत्येक प्राणी हा खाण्यासाठीच असतो अशी बहुतेक चिनी लोकांची धारणा आहे. हि धारणा निसर्गाचा ऱ्हास करणारी आहे हे त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नाही. चीनचा अवघा इतिहासाच निसर्गविरोधी गोष्टींनी भरला आहे. १९५८ साली जेव्हा कम्युनिस्ट चीनची निर्मिती झाली तेव्हा माओ त्से तुंग या त्यांच्या पहिल्या कम्युनिस्ट अध्यक्षाने एक अजीबच फतवा काढला. माओ त्से तुंग हा एक हुकूमशहाच होता, माणसाने निसर्गावर राज्य करावं अशी घोषणा त्याने दिलेली.         

कम्युनिस्ट राजवटीत शेत जमीन हि सरकारच्या मालकीची असते. आणि या माओ ला कोणी तरी सांगितले की उंदीर, डास आणि माश्या हे अनुक्रमे प्लेग, मलेरिया आणि टायफॉईड रोगांस कारणीभूत असल्यामुळे खूप नुकसान करतात. चिमण्या शेतातील धान्य आणि फळे खात असल्यामुळे त्यांना पण ह्या सगळ्यांना मारायचा हा फतवा होता. याला फोर पेस्ट्स कॅम्पेन म्हंटले गेले. सगळ्यात जास्त नाश करणाऱ्याला घसघशीत बक्षिसे दिली जाणार होती.  

डास, माश्या आणि उंदीर मारणे तसे अवघड काम असल्याने, सगळे चिमण्यांच्या मागे पळायला लागले. चिनी लोक सापळे लावून चिमण्या पकडू लागले. बंदुकीने, गोफणीने चिमण्यांची शिकार करू लागले. त्यांचे घरटे उध्वस्त करू लागले. ड्रम, वाद्ये ह्यांच्या साहाय्याने मोठमोठे आवाज काढुन चिमण्यांना पिटाळू लागले. गरीब बिचाऱ्या चिमण्या ह्या त्रासाने वैतागून दमून खाली पडू लागल्या आणि क्रूरपणे मारल्या जाऊ लागल्या.

उपक्रम काळामध्ये अंदाजे १०० कोटी चिमण्या, १५० कोटी उंदीर, करोडो माश्या आणि डास मारण्यात आले. एकंदरीत चिनी सरकारचा उपक्रम यशस्वी झाल्यात जमा होता.

निसर्गावर केलेल्या ह्या आक्रमणाचा जबरदस्त तडाखा चीनला सोसावा लागला. चिमण्यांच्या बेसुमार कत्तलीमुळे शेतीचा नाश करणाऱ्या अनेक कीटकांची संख्या बेसुमार वाढू लागली. ह्या कीटकांचा फडशा पाडून शेतीचे रक्षण करणाऱ्या चिमण्याच नसल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी घट होऊ लागली. सुरुवातीला १५% असणारी ही घट पुढे चक्क ७०% पर्यंत पोचली.

सामान्य जनतेवर ह्याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला. अन्नधान्याच्या तुटवड्याची आणि निसर्गाचा समतोल बिघडवल्याची परिणीती दुष्काळात झाली. पुढील काही वर्षात भयंकर उपासमारीने चीन मध्ये थैमान घातले. ज्यात अंदाजे २ ते ४ कोटी लोक मृत्युमुखी पडले. 

हि घटना सांगायचे कारण असे कि चीनचे हुकूमशाह चिनी लोकांच्या जीवाचा विचार करणारेच नसतात तर ते मानव जातीचा काय विचार करणार ? १९५८ नंतरच्या काळात चीन मध्ये झपाट्याने कारखानदारी वाढायला लागलेली. 

नद्या आटवून, डोंगर फोडून माओ ने कारखानदारीला अनुकूल वातावरण तयार करायला सुरवात केलेली. याच्या आड जो कोणी आला त्याला या माओ ने संपवल. 

आज निसर्गाचा समतोल बिघडवण्यासाठी चीनने जणू कंबरच कसली आहे. चीनला माणसाने निसर्गावर विजय मिळवायला हवा आहे त्यामुळे हलणारा कोणताही प्राणी खात जाण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे चीन हि अनेक विषाणूंच्या उत्पत्तीची जननी बनत चालली आहे.