व्हाट्सएप हेरगिरी प्रकरण काय आहे ?

281

आंतरजालाच्या माध्यमातून हेरगिरी अनेक प्रकारे होत असते आपल्या ब्राउझरच्या कुकीज पण अनेकवेळा हेरगिरी करतात पण ती केवळ एका विशिष्ट मर्यादेत असते, आपण ज्या गोष्टी सर्च करतो त्या गोष्टीची माहिती जमा करून त्या प्रमाणे वेबसाईटवर आपल्याला जाहिराती दाखवल्या जाणे ही साधारण सर्वांना माहिती असणारी हेरगिरी पण व्हाट्सएपच्या माध्यमातून हेरगिरी करण्याची एक घटना समोर आली आणि अवघे विश्वच हादरून गेले.  

३१ ऑक्टोबर २०१९ या दिवशी फेसबुकने (व्हॉट्सअपचा मालक) कबुल केलं की भारतातील काही पत्रकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला गेला. HuffPost India च्या बातमीनुसार प्रफुल पटेल यांच्यासह ४१ जणांवर गुप्त पाळत ठेवण्यासाठी पिगासीसचा वापर करण्यात आला. व्हाट्सएपने एनएसओ या पिगासीस बनवणाऱ्या कंपनीवर खटला  भरला आहे ज्यात १४०० लोकांचे व्हाट्सएप हॅक केल्याचा आरोप आहे.   

जगात खर तर संदेश वहनासाठी व्हाट्सएप हे खूप सुरक्षित माध्यम मानले जाते, पण इज्राइलच्या एनएसओने ते देखील हॅक  तंत्रज्ञान बनवले, आणि  त्याला नाव दिले पिगासीस. हे एक प्रकारचे स्पायवेयर आहे, या स्पायवेयरचे  महत्वाचे काम  मोबाईल मधील व्हाट्सएपवर हेरगिरी करणे आहे. विशेष म्हणजे या मध्ये ” मेसेज, कॉल्स हिस्टरी, लोकेशन, फाईल्स, कॅमेरा, माईक” ह्या संदर्भातील संपूर्ण माहिती पिगासीसकडे उपलब्ध होते.  ज्या लोकांवर पाळत ठेवली गेलेली त्यांना कॅनडा स्थित सिटीझन लॅब मधून  पहिले फोन अथवा मेसेज आलेला. कोणत्याही एपच्या डाउनलोड शिवाय केवळ मिस्स्ड कॉल वरून पूर्ण फोनचा ताबा या पिगासीसकडे हस्तांतरित केला गेलेला असा आता माहितीतून दिसून येत आहे.   

इतर कोणाच्या व्हाट्सएपच्या संदेशांवर नजर ठेवता आली तर काय काय माहिती मिळेल हि कल्पनाच अंगावर शहरे आणणारी आहे. पण तूर्तास  कोणीही सामान्य माणूस पिगासीस विकत घेऊ शकत नाही. पिगसीस हि प्रणाली  केवळ देशातील सरकारी व्यवस्थेला विकत घेता येऊ शकते म्हणूनच हेरगिरी उघडकीस आल्यानंतर संशयाची पहिली सुई फिरते ती त्या देशातील सरकारवर. 

फेसबूकने कॅलिफोर्निलाया कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रानुसार हे सॉफ्टवेअर केवळ सरकारी यंत्रणांनाच विकता येऊ शकतं. तसेच हे सॉफ्टवेअर नीट चालावं  म्हणून ते सुरू करण्यासाठी त्या-त्या देशात आधी ४ आठवडे स्थानिक मोबाईल नेटवर्कसोबत टेस्ट करावी लागते. ज्यासाठी या सॉफ्टवेअरला या स्थानिक नेटवर्क्सचा ऍक्सेस मिळावा लागतो; जो फक्त सरकारकडे असतो.