व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आणि एंजल इन्व्हेस्टर काय फरक आहे दोन्हीत ?

478


स्टार्टअप्सच्या दुनियेत वावरत असताना बरेचदा मला या दोन संज्ञा ऐकायला मिळतात. बऱ्याचदा या दोन्ही संज्ञा परस्परांना समानार्थी म्हणून वापरल्या जातात पण प्रत्यक्षात या दोन्हीत बराच फरक आहे. या लेखात आपण जाऊन घेउ नक्की काय आहे हा फरक. 

एन्जेल्स हे वैयक्तिक गुंतवणूकदार असतात, एखाद्या मोठ्या कंपनीच्या प्रमुख पदी अथवा वित्तीय प्रमुख पदी राहिलेले असल्याने त्यांचाकडे स्वतःचे खर्च भागवून पैसे असतात जे त्यांना चांगल्या कल्पनांमध्ये  गुंतवायचे असतात.  भारतात मुंबई एन्जेल्स, बंगलोर एन्जेल्स असे अनेक समूह आहेत जिथे वैयक्तिक गुंतवणूकदार एकत्र येऊन पैसे गुंतवतात. 

एन्जेल्स स्वतः कमावलेले पैसे एखाद्या व्यवसायात टाकतात तर दुसऱ्या बाजूला व्हेंचर कॅपिटॅलिस्ट म्हणजे एक कंपनी अथवा संस्था असते. या कंपनी कडे थोडे फार स्वतःचे भांडवल असते पण अनेक ठिकाणहून ( म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स कंपन्या अथवा बँकांकडून) पैसे उभे करून हे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट एखाद्या चांगल्या व्यवसायावर लावतात. 

एन्जेल्स एखाद्या कल्पनेत पैसे गुंतवतो तर व्हेंचर कॅपिटॅलिस्ट एका व्यवसायात पैसे गुंतवत असतो. पैसे गुंतवल्या नंतर एन्जेल्स रोजच्या घडामोडीत पण सहभागी असतात तर व्हेंचर कॅपिटॅलिस्ट हे फक्त महत्वाच्या निर्णयात सहभागी असतात. 

एंजल असोत कि व्हेंचर कॅपिटॅलिस्ट हे तीन प्रकारे पैसे गुंतवत असतात 

  1. कर्जाच्या स्वरूपात 
  2. परिवर्तनीय रोखे खरेदी करून  
  3. समभाग खरेदी करून 

रतन टाटा, नारायण मूर्ती हे वैयक्तिक पैसे गुंतवतात ते एक एंजेल म्हणून तर ब्लॅकस्टोन, केकेआर या कंपन्या पैसे गुंतवतात त्या एक संस्था म्हणून.