भारतात वाढते आहे सर्टिफाईड अँटी मनी लॉण्डरिंग एक्स्पर्ट्सची मागणी

  827

  मेक्सिको आणि कोलंबियामध्ये ड्रग कार्टेलला नकळतपणे असेल कदाचित पण मदत केली म्हणून एचएसबीसी  बँकेला १९० कोटी डॉलर इतका महाप्रचंड दंड अमेरिकेतल्या न्यायालयांना भरावा लागला आणि बँकिंग विश्व ढवळून निघाले, त्यानंतर मनी लौंडेरिंग कायद्याचे उल्लंघन केले म्हणून दंड भरायची जणू लाटच आली, जगातल्या अनेक महत्वाच्या बँकांनी वेळोवेळी कित्येक कोटींचे दंड भरले आहेत.  २००९ पासून ते २०१७ पर्यंत मनी लौंडेरिंग कायद्याचे पालन करत नाही म्हणून ३४२० कोटी डॉलर्स दंडाची एकत्रित रक्कम जग भरातल्या बँकेतून विविध नियमकानी वसूल केली आहे. मनी लौंडेरिंग कायद्याच्या उल्लंघनामुळे  होणारे दंड ही आज सर्व जागतिक बँकांसमोरची आपत्ती बनली आहे.

  भारतातल्या कॅनरा बँक, बँक ऑफ बरोडा या बँकांना जागतिक नियमकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. या आपत्तीमुळे एक गोष्ट मात्र चांगली घडत आहे ती म्हणजे सर्टिफाईड अँटी मनी लौंडेरिंग एक्सपर्टस्ची मागणी कित्येक पटीने वाढत आहे. या सगळ्या जागतिक बँका आज भारताकडे त्यांचा प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी याचना करत आहेत आणि या सगळ्या बँकात निर्माण होताहेत रोजगार, बँकेला मनीलौंडेरिंग थोपवण्यासाठी मदत करू शकेल अशा कुशल मनुष्यबळाची मागणी दिवसागणिक वाढत आहे.

  इंडियाफोरेंसिक संस्थेने केलेल्या पाहणी नुसार पुढील ३ वर्षात सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्टसची मागणी किमान १०० टक्क्याने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  भारतात मनी लोंडरिंग हा २००२ पर्यंत काही गुन्हा नव्हता, ती पैशाचा रंग बदलायची एक कला होती पण केंद्राने २००२ साली कायदा पारित केला आणि २००५ साली त्याची अंमलबजावणी चालू झाली. त्या नंतर अनेक बँकमध्ये मनी लोन्डरिंग मधील तज्ञांची गरज भासायला लागली. मनी लौन्डेरिंग व्यवहाराची माहिती असलेल्या लोकांसाठी नोकरीची दारे सताड उघडली गेली.

  इंडियाफोरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीज या संस्थेने २००६ साली भारतात सर्व प्रथम सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट नावाचा अभ्यासक्रम चालू केला आणि पाहता पाहता या अभ्यासक्रमाने भारताबाहेर मुहूर्तमेढ रोवली. आज भारतातील सर्व महत्वाच्या बँकांमध्ये किमान एक तरी सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट हजर आहे. हे सर्टिफिकेशन पूर्ण  केल्यावर अनेक संधी जागतिक बँकात उपलब्ध होताहेत बेकायदेशीर अथवा गुन्ह्यांची फलश्रुति असलेल्या अथवा कोणत्याही वैध आर्थिक व्यवहाराविना मिळवलेल्या पैशांचे व्यवहार हे संशयास्पद या गटवारीत येतात. अशा पद्धतीने झालेल्या कोणत्याही व्यवहाराची नोंद बँकेला financial intelligence unit इथे करावी लागते. पण या नोंदी करण्यात भारतीय बँकांना म्हणाव तितकस यश आलेल नाही. अनेक संशयित व्यवहार आज पण बँकांकडून नजर चुकीने नोंदवायचे राहून जात होते, बँकेमध्ये जमा होणारी रोख रक्कम का, कुठून आणि कशी असे अनेक प्रश्न निर्माण करते,  आंतर्राष्ट्रीय व्यापारात अनेक वेळेस पैशाचा रंग बदलायची किमया साधली जाते आणि गेल्या काही दिवसात तर बिटकॉइन नावाचा नवीन भस्मासुर पण मनीलौंडेरिंगच्या क्षितिजावर दिसायला लागला आहे   रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी झगडून हे मनीलौंडेरिंग थांबवायचे कसे, त्यासाठी काय  उपाय योजना कराव्यात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर इंडियाफोरेन्सिक या संस्थेच्या सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट या कार्यक्रमातून दिली जाते. मनी लोंडरिंग म्हणजे पैशाचा रंग बदलून काळ्याचा पांढरा करणे असा सर्वमान्य अर्थ आपल्या देशात रूढ झाला आहे. पैशाचा रंग बदलायची बँक ही सर्वोत्कृष्ट जागा आहे. त्याला इतर अनेक पर्याय असले तरी बँक सर्वात श्रेष्ठ जागा आहे. आज बँकांना या नवीन आर्थिक राक्षसाशी झगडायला मोठी कुमक मिळाली आहे, अनेक बँकांनी संगणक प्रणाली वापरायला सुरुवात केली आहे, पण याचा खरच किती उपयोग झाला आहे हा एक नवीन वादाचा मुद्दा आहे.

  वोल्फबर्ग या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार आज बँकांनी किमान काही गोष्टी करण्याची गरज आहे त्यात म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना या विषयावरच सर्वोत्तम प्रशिक्षण द्यायला हव आहे, संगणक प्रणाली वापरली म्हणजे सगळे प्रश्न सुटतात हा भ्रम काढून टाकायला हवा आहे. मनी लोंडरिंग करायच तंत्रज्ञान रोज बदलत आहे, कधी हवालादार तर कधी चंगेडिया अशी नवीन नवीन लोक जन्माला येतात, निश्चलनीकरणामुळे, रोज वाढणाऱ्या दंडाच्या रकमामुळे  अनेक आर्थिक तज्ज्ञ पैशाचा रंग बदलायच्या शकला लढवत आहेत पण या मधूनच मनी लौंडेरिंग शोधण्याची आस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत, बँकांना सेवा पुरवणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्या, बँक, आयकर विभाग, पोलीस यंत्रणा आदी ठिकाणी कुशल मनुष्यबळाची निकड भासते आहे, सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट हा अभ्यासक्रम संपवलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या बँक्स मध्ये मोठ्या हुद्य्यांवर काम करीत आहेत. कॉमर्स क्षेत्रात येउन वेगळी वाट चोखाळायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी,सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट हा करीयरचा नवा हुकमी एक्का होऊ पाहत आहे. या विषयावर आपली मते नोंदवण्यासाठी  आपण इंडियाफोरेंसिक या संस्थेला थेट ९७६६५९४४०१ या क्रमांकावर किंवा education@इंडियाफोरेंसिक.कॉम  या ई-मेल वर संपर्क साधू शकता.