आर्थिक घोटाळे शोधणे हा एक करियरचा नवीन पर्याय होत आहे का ?

5828

निरव मोदी असेल किंवा विजय मल्ल्या असेल , फ्रॉड करून पाळणाऱ्या लोकांची संख्या भारतात कमी नाही. बरेच जण करतात, म्हणजे घोटाळा करायचा आणि कायदेशीर रित्या सुटायचं कसं ह्याचा प्लान तयार करून ठेवायचा, घोटाळा उघड झाला की प्लान अमलात आणायचा आणि बाहेर पडायचं. जास्तीत जास्त ३ वर्षाची शिक्षा. याच मानसिकतेमुळे घोटाळ्यांचा संख्येत आणि रकमेत उत्तरोत्तर वाढच होत गेली आहे. घोटाळ्यांचा आवाका जसं वाढायला लागला तसा त्यात गुंतलेल्या लोकांची व्याप्ती पण वाढायला लागली. यामुळे आर्थिक घोटाळयांचा शोध घेणाऱ्या मंडळींना नवीन संधी उपलब्ध झाल्या खर्या पण  कित्येक लोक तर त्यांचा नकळत या घोटाळ्यांमध्ये खेचली गेली. अनेकदा घोटाळ्यांचा संशोधन करताना असं लक्षात येत कि नुकत्याच पदवीधर झालेल्या लोकांना बऱ्याचदा आपण करतो आहोत तो घोटाळाच आहे हे लक्षात पण आलेलं नसते आणि कसे  येणार ?

आपण नाव पदवीधरांना फोरेन्सिक अकौन्तन्ट अथवा फोरेन्सिक लेखा परीक्षणाच्या पुरेशा कवच कुंडलान्शिवाय कोर्पोरेट जगतात पाठवत आहोत. कोणत्याच नवपदविधरांकडे आर्थिक घोटाळ्यांचे शास्त्रशुद्ध ज्ञान नसते, उर्मी असते ती केवळ पैसे कमवायची. हे वयच तसं असतं. काही तरी बनून दाखवायचं , खूप श्रीमंत व्हायचे , जगाला दखल घ्यायला भाग पडण्याचे, या नादात कित्येक लोक आपले स्वकष्टाचे पैसे गुंतवण्याचा नवीन वाट चोखाळतात. अनेकदा लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी पैसे गुंतवले जातात तर कधी साखळी गुंतवणुकीत. आणि प्रत्येकाला आपलं आभाळ  नवीनच वाटत असतं.  गेल्या वर्षात लिमोझिन, शेयर बाजार इत्यादी ठिकाणी पैसे गुंतवून दाम दुप्पट मिळवण्याच्या फंदात हात पोळून घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे, पण या सगळ्यावर कहर केला तो आत्ताच उघडकीला आलेल्या सिटी बँकेचा घोटाळ्याने. १८ टक्के परतावा मिळवण्याचा नादात हिरो होंडा सारख्या कसलेल्या कंपनीचा मंडळींनी पण पैसे गुंतवावेत म्हणजे अज्ञानाचा सगळ्यात मोठ्ठा कहर होता.    
तुमच्या एक लक्षात आलंय का?….

कि घोटाळे जसे वाढताहेत तसे ते घोटाळे शोधल जाण्याच प्रमाण पण वाढत आहे. काही वर्ष पूर्वी पर्यंत घोटाळे या विषयची चर्चा प्रसार माध्यमातून क्वचित होत असे. गेल्या काही दिवसात या विषयाबाबत जागरुकता वाढत आहे. घोटाळे उघडकीस आणणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या घोटाळ्यांमुळे जगामध्ये सध्या प्रमाणित फोरेन्सिक अकौन्टांतची मागणी वाढत आहे.

वल्ड बँकेचे श्री केमर यांनी असं भाकीत केला आहे कि येत्या काही वर्षात जी तेजी एकेकाळी अनुभवली होती तीच तेजी आर्थिक घोटाळयांशी लढणारी मंडळी अनुभवू शकतात. इंडियाफोरेंसिक या संस्थेने २००९ मध्ये केलेल्या पाहणी नुसार भारताला  पुढच्या ५ वर्षात जवळ जवळ १ लाख फॉरेन्सिक अकॉउंटण्ट्सची गरज भासणार आहे, सद्य सरकारचा रोख बघता हे संख्याबळ देखील कमीच पडेल अशी स्थिती आहे आणि आज भारतात केवळ ६००० प्रमाणित फॉरेन्सिक अकाउंटंट्स आहेत. ही आकडेवारी पाहिल्यावर  लोकांना प्रश्न पडेल हे Forensic Accounting म्हणजे नक्की आहे तरी काय?….. तर अकौन्टिन्ग, तंत्रज्ञान, आणि  ईन्व्हेस्टीगेशन  अशी सर्व प्रकारची कौशल्ये एकत्र वापरून न्यायालयात सादर करता येईल असा ठोस पुरावा शोधणे वा मिळविणे म्हणजे “फॉरेन्सिक अकाउंटिंग. कॉरपोरेट जगतामाधल्या सत्यम आणि सरकारच्या स्पेक्ट्रम या दोन महा घोटाळ्यांमुळे इतर कंपन्यांना ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव झाली कि इतक्या मोठ्या प्रमाणातले आर्थिक गुन्हे आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान करू शकतात. अनेक कंपन्या या नवीन प्रश्नाशी लढण्यासाठी सरसावल्या आणि एक गोष्ट ह्या कंपन्यांच्या लक्षात आली ती म्हणजे ह्या आर्थिक गुन्ह्यांना लोकांसमोर आणण्यासाठी जे तज्ञ मनुष्यबळ हव आहे ते भारतात फारच कमी आहे. सध्या तरी अकौन्टिन्ग म्हणल्यावर पहिले डोळ्यासमोर येतात ते सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल्स, हा एक जगमान्य सर्टिफिकेशन प्रोग्रॅम आहे,  आज भारतातल्या अनेक महत्वाच्या आर्थिक घोटाळ्यांचा संशोधनावर सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल्स  काम करीत आहेत, कित्येक हजार कोटीचे घोटाळे हि मंडळी थांबवत किंवा उघडकीस आणत आहेत, या क्षेत्रात बरेचदा चार्टर्ड अकाउंटंट्स पण काम करताना दिसतात  पण फॉरेन्सिकअकाउंटिंग या  क्षेत्रात येण्यासाठी चार्टर्ड अकौन्टन्ट असणे हे अजिबातच बंधनकारक नाही.

उलट चार्टर्ड अकाउंटंट्सने इन्वेस्टीगेशन करणे हा कॉन्फ्लिक्ट्ट ऑफ इंटरेस्ट आहे , गेल्या काही दिवसात आर्थिक घोटाळ्यात कारवाई झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढत आहे. खरा म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटंट बनण्यासाठी अकाउंट्‌सचे सखोल ज्ञान असायला हवे , न्याय व्यवस्थेचे ज्ञान (Legal Matters), तंत्रद्यानाची माहिती आणि Investigative Skills हे गुण अंगभूत असलेली कुणीही व्यक्ती या क्षेत्रात प्रवेश करू शकते. 

सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल्स हा प्रोग्रॅम पूर्ण करणे आवश्यक नसले तरी फायदेशीर नक्कीच आहे, शोधाचा ध्यास घेण्याची वृत्ती असलेला कोणीही माणूस फॉरेन्सिक अकाउंटंट बानू शकतो ! गैरव्यवहाराचा शोध व अटकाव अशा स्वरूपाचे हे क्षेत्र अत्यंत थरार असलेले आहे. यात प्रसंगी पोलिस खात्याची पण मदत घ्यावी लागते. पुराव्यांचा आधार घेत घेत गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्याची ही प्रक्रिया आहे. मनुष्य प्राणी जन्माला येत आहे तोवर नवीन नवीन घोटाळ्यांचा पद्धती जन्माला येताच राहणार आणि फोरेन्सिक अकौन्टन्ट्स ना काम हे मिळतच राहणार, नेहमीच्या वाटा न चोखाळता स्वतःच्या अनुभवांची पायवाट करून आपले उद्दिष्ट गाठायचे असेल तर “फॉरेन्सिक अकाउंटिंग’चे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले आहे!