मनिलॉंडरिंगचा तपास करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते का? असेल तर ते कोणते?

  7384

  ८ नोव्हेंबरला माननीय पंतप्रधानांनी निश्चलनीकरणाची घोषणा केली आणि भारतभर त्याचे प्रतिसाद उमटले. गेला महिनाभर रोज निश्चलनीकरणाबद्दल उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध आले आहेत, आयकर कायद्याच्या तरतुदी बदलल्या गेल्या आहेत आणि बेनामी मालमत्तांना आळा घालणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.   

  पंतप्रधानांनी काळ्या पैशांवर केलेल्या हल्ल्यानंतर मनी लोंडरिंग हा शब्द घराघरात पोचला, रोख पैसे बाळगणाऱ्या मंडळींनी सोने, परदेशी चलन विकत घेण्याचा सपाटा लावला  आणि पैशाचा रंग बदलायच्या विविध किमया सर्वश्रुत झाल्या. पण या राष्ट्रीय आपत्तीतून एक संधी निर्माण झाली, ती प्रशिक्षित मनी लौंडेरिंग तज्ज्ञांसाठी. ८ नोव्हेंबर पूर्वी पन्नास हजारांचावर भरणा करताना पॅन नंबर द्यावा लागत होता पण निश्चलनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये रोख भरणा करायचे नवीन नियम अस्तित्वात आले, त्या साठी बँकिंग प्रणाली बदलायची गरज निर्माण झाली, ३१ डिसेंबर नंतर मागील ५० दिवसात झालेल्या व्यवहारांची पडताळणी करायला मोठ्या प्रमाणात तज्ज्ञांची गरज बँक आणि आयकर विभागाला भासणार आहे.

  इंडियाफोरेंसिक संस्थेने केलेल्या पाहणी नुसार पुढील ३ वर्षात सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्टसची मागणी किमान १०० टक्क्याने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  मनी लोंडरिंग हा २००२ पर्यंत काही गुन्हा नव्हता ती पैशाचा रंग बदलायची एक कला होती पण केंद्राने २००२ साली कायदा पारित केला आणि २००५ साली त्याची अंमलबजावणी चालू झाली. त्या नंतर अनेक बँकमध्ये मनी लोन्डरिंग मधील तज्ञांची गरज भासायला लागली. मनी लौन्डेरिंग व्यवहाराची माहिती असलेल्या लोकांसाठी नोकरीची दारे सताड उघडली गेली. इंडियाफोरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीज या संस्थेने २००६ साली भारतात सर्व प्रथम सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट नावाचा अभ्यासक्रम चालू केला आणि पाहता पाहता या अभ्यासक्रमाने भारताबाहेर मुहूर्तमेढ रोवली.

  आज भारतातील सर्व महत्वाच्या बँकांमध्ये किमान एक तरी सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट हजर आहे. बेकायदेशीर अथवा गुन्ह्यांची फलश्रुति असलेल्या अथवा कोणत्याही वैध आर्थिक व्यवहाराविना मिळवलेल्या पैशांचे व्यवहार हे संशयास्पद या गटवारीत येतात. अशा पद्धतीने झालेल्या कोणत्याही व्यवहाराची नोंद बँकेला financial intelligence unit इथे करावी लागते. पण या नोंदी करण्यात भारतीय बँकांना म्हणाव तितकस यश आलेल नाही. अनेक संशयित व्यवहार आज पण बँकांकडून नजर चुकीने नोंदवायचे राहून जात होते आणि आता निश्चलनीकरणाच्या वेळेत अनेक लोकांनी गर्दीचा फायदा घेतला असण्याची शक्यता आहे. निश्चलनीकरणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जमा होणारी रोख रक्कम आणि त्या सोबत निर्माण होणाऱ्या का, कुठून आणि कशी अशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी या विषयातील तज्ज्ञांची निकड भासणार आहे. या विषयावर सखोल माहिती इंडिया फोरेन्सिक या संस्थेच्या सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट या कार्यक्रमातून दिली जाते. मनी लोंडरिंग म्हणजे पै

  शाचा रंग बदलून काळ्याचा पांढरा करणे असा सर्वमान्य अर्थ आपल्या देशात रूढ झाला आहे. पैशाचा रंग बदलायची बँक ही सर्वोत्कृष्ट जागा आहे. त्याला इतर अनेक पर्याय असले तरी बँक सर्वात श्रेष्ठ जागा आहे. आज बँकांना या नवीन आर्थिक राक्षसाशी झगडायला मोठी कुमक मिळाली आहे, अनेक बँकांनी संगणक प्रणाली वापरायला सुरुवात केली आहे, पण याचा खरच किती उपयोग झाला आहे हा एक नवीन वादाचा मुद्दा आहे. वोल्फबर्ग या अंतर राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार आज बँकांनी किमान काही गोष्टी करण्याची गरज आहे त्यात म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना या विषयावरच सर्वोत्तम प्रशिक्षण द्यायला हव आहे, संगणक प्रणाली वापरली म्हणजे सगळे प्रश्न सुटतात हा भ्रम काढून टाकायला हवा आहे. मनी लोंडरिंग करायच तंत्रज्ञान रोज बदलत आहे, कधी हवालादार तर कधी चंगेडिया अशी नवीन नवीन लोक जन्माला येतात, निश्चलनीकरणामुळे अनेक आर्थिक तज्ज्ञ पैशाचा रंग बदलायच्या शकला लढवत आहेत पण या मधूनच मनी लौंडेरिंग शोधण्याची आस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत, बँकांना सेवा पुरवणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्या, बँक, आयकर विभाग, पोलीस यंत्रणा आदी ठिकाणी कुशल मनुष्यबळाची निकड भासते आहे, सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट हा अभ्यासक्रम संपवलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या बँक्स मध्ये मोठ्या हुद्य्यांवर काम करीत आहेत. कॉमर्स क्षेत्रात येउन वेगळी वाट चोखाळायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी,सर्टीफाईड ऐन्टी मनीलौन्डरिंग एक्स्पर्ट हा करीयरचा नवा हुकमी एक्का होऊ पाहत आहे