भारतीय तंत्रज्ञानाला पडलेले “सुंदर” स्वप्न

390

सुंदर पिचई हे भारतीयांना पडलेले सुंदर स्वप्न आहे. गुगल सारख्या जगप्रसिद्ध कंपनीचे नेतृत्व एका भारतीयाकडे असणे हि स्वप्नवत गोष्ट आहे. सुंदर यांचा जन्म १९७२ साली मदुराई मधल्या एका तामिळ मध्यम वर्गीय कुटुंबात झालेला. 

मध्यम वर्गीय म्हणजे ८० च्या दशकातले २ रूमच्या फ्लॅट मध्ये राहणारे, स्कुटरसाठी ३ वर्ष वाट पाहणारे,फ्रिजला चैन समजणारे आणि जमिनीवर गाद्या घालून झोपणारे कुटुंब. 

तंत्रज्ञानाची माहिती पटवून देणारी एक घटना त्यांच्या लहानपणीच घडली होती असे ते सांगतात. 

सुंदरच्या लहानपणी त्याची आई आजारी होती.  सुंदरला एक तास प्रवास करून रक्ताचे नमुने आणायला जावा लागायचे, तिथे गेल्यावर सुद्धा लगेच ते नमुने मिळतीलच याची कोणती शाश्वती नव्हती. त्यातच त्यांच्या  कडे फोन आला आणि फोनवरून त्याला चुटकी सरशी कळायला लागले कि नमुने केव्हा येणार आहेत. त्यामुळे मग त्याचा प्रवासातला वेळ कमी होऊ लागला, मग लहानग्या सुंदर ने दुनियाभरचे टेलेफोन नंबर पाठ करून ठेवलेले. सुंदरचे शिक्षण चेन्नई मधल्या जवाहर कॉलेज मधून झाले आणि मग त्याला आय आयटी खरगपूरला प्रवेश मिळाला, जिथे त्याला कळलं कि “अबे साले” हि एकमेकांना संबोधायचे प्रथा आहे.  २०१७ साली ते आयआयटी मध्ये आलेले असताना त्यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आणि सांगितलं कि आयआयटी मध्ये असलो तरी काही पेपर मध्ये मला सी ग्रेड पण मिळाली होती, अभ्यास महत्वाचा असतो पण मार्क्स नाही हे देखील सुंदर यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं. 

२००४ साली गुगल २०१५ इतके आकर्षक नव्हते. त्या काळात सुंदर पिचई हे मॅकेंझी या जगप्रसिद्ध सल्लागार कंपनिसाठी अमेरिकेत काम करीत होते. २००४ मध्ये गुगलकरता पिचई हे उपलब्ध असलेला सर्वात योग्य पर्याय होता. गुगलला त्या वेळी एका बाह्य नेतृत्वाची गरज होती आणि पिचाई हे त्या नेतृत्वाच्या व्याख्येत फिट बसले. 

लॅरी पेज या गुगलच्या प्रवर्तकाला नाविन्याची वेध लागलेले आणि त्याला एक नवीन सीईओ हवा होता.  मुख्य कार्यकारी अधिकारी हा मुळातच बिझिनेस डेव्हलपमेण्टचा तज्ञ असतो परंतु कर्मचार्‍यांसाठी त्याला कंपनीच्या सेल्स, मार्केटींग, लॉ, प्रोग्रामिंग, डिझाईन, कस्टमर सपोर्ट इत्यादी इतर कामांबद्दलही माहिती असणे आवश्यक असते. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सुंदर यांना लॅरी पेजची व्हिजन समजली, तो काय घडवू पाहतो आहे हे त्यांना उमगलं आणि हि व्हिजन सर्व सामान्य गुगल कर्मचाऱ्या पर्यंत पोचवायच महत्वाचे काम त्यांनी केलं. 

श्री. पिचई यांच्याकडे उत्कृष्ट उत्पादन व्यवस्थापक होण्यासाठी कौशल्य, अनुभव आणि क्षमता होती. गुगल मध्ये त्यांच्या कडे सर्वात प्रथम जीमेलची जबाबदारी देण्यात आली, क्रोम हे गुगलच्या यशस्वी उत्पादनातील एक, क्रोमच्या यशा नंतर त्यांच्या कडे अँड्रॉइड विभागाची जबाबदारी देण्यात आली.     

याच कारणामुळे सुंदर पिचई यांना मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची पण ऑफर आलेली पण त्यांना गुगलने जास्त पगार देऊन त्यांना थांबवून ठेवले.

अल्फाबेट कंपनी चालू केल्यावर गुगलचे नेतृत्व सुंदर पिचाई कडे सोपवण्याचा निर्णय एक मुखाने मान्य केला गेला. 

आज सुदंर पिचई हे केवळ गुगलच नाही तर गुगलची पालकसंस्था असलेल्या अल्फाबेटचे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि आज ते अंदाजे वर्षभरात ३३५ कोटी रुपये पगार कमावतात.