हजारो फॉरेन्सिक अकाउंटंट्‌सची गरज आपल्याला भासणार

0
61

वर्तमानपत्रात कोळसा,३जी, कॉमनवेल्थ, आदर्श, सिंचन, अशी रोजची नवीन घोटाळयांची नावं ऐकून मन सुन्न होते, पंतप्रधानांना भ्रष्टाचाराबाबत बोलत असताना हतबल झालेला पहिला कि हे घोटाळे भारतासमोरची मोठी आपत्ती वाटायला लागते. पण म्हणतात ना आपत्तीतून बरेचदा संपत्ती निर्माण करता येते. फॉरेन्सिक अकाउंटिंग हे क्षेत्र अशाच एका आपत्ती मधून उदयाला आला आहे. अकौन्टिन्ग, तंत्रज्ञान, आणि  ईन्व्हेस्टीगेशन  अशी सर्व प्रकारची कौशल्ये एकत्र वापरून न्यायालयात सादर करता येईल असा ठोस पुरावा शोधणे वा मिळविणे म्हणजे “फॉरेन्सिकअकाउंटिंग.’ इंडियाफोरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीज या पुण्यातील संस्थेने केलेल्या पाहणी नुसार  येत्या तीन वर्षांत सुमारे हजारो फॉरेन्सिक अकाउंटंट्‌सची गरज आपल्याला भासणार आहे. सत्यमचा घोटाळा २००९ मध्ये उघडकीस आला आणि अवघा देश आर्थिक घोटाळयांबद्दल बोलू लागला. वर्तमान पत्रांमधून अनेक नवीन कंपन्यांची नावे सत्यमचे वारसदार म्हणून जाहीर व्हायला लागले आणि मग सुरु झाला ते आर्थिक घोटाळ्यांचा विरोधात एक नवीन पर्व. कॉरपोरेट जगतामाधल्या ह्या महाघोटाळ्याने इतर कंपन्यांना ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव झाली कि इतक्या मोठ्या प्रमाणातले आर्थिक गुन्हे आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान करू शकतात. अनेक कंपन्या या नवीन प्रश्नाशी लढण्यासाठी सरसावल्या पण या लढाईत लढणाऱ्या शिलेदारांची ताकद कमी पडू लागली. अकौन्टिन्ग म्हणल्यावर पहिले डोळ्यासमोर येतात ते सनदी लेखापाल त्यामुळे कोणी सनदी लेखापालांकडे गेलं तर कोणी फौजी अधिकार्यांकडे. आज अनेक चार्टर्ड अकौन्टन्ट फोरेन्सिक अकौन्टन्ट म्हणून काम करीत आहेत पण या क्षेत्रात येण्यासाठी चार्टर्ड अकौन्टन्ट असणे हे बंधनकारक नाही. त्यासाठी अकाउंट्‌सचे सखोल ज्ञान, न्याय व्यवस्थेचे ज्ञान (Legal Matters), तंत्रद्यानाची माहिती, अन्वेषणाचा दृष्टिकोन (Investigative Skills) इत्यादी गुण अंगभूत असलेली कुणीही व्यक्ती या क्षेत्रात प्रवेश करू शकते. शोधाचा ध्यास घेण्याची वृत्ती मात्र हवी!  फोरेन्सिक अकौन्टिन्ग या विषयावर प्रशिक्षण देणारा सर्टीफ़ेएड फोरेन्सिक अकौन्टिन्ग प्रोफेशनल हा भारतामधील एकमेव व्यावसायिक अभ्यासक्रम आहे.  हा अभ्यासक्रम सध्या फ्रौडेक्सप्रेस या संस्थेद्वारे संचालित संचालित केला जातो.अपूर्वा जोशी या फ्रोदेक्स्प्रेस च्या संचालिका आहेत . व्यावसायिक अभ्यासक्रमाचे extension म्हणता येईल असा हा पर्याय आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करायला ३ वर्षाचा अनुभव आर्थिक क्षेत्रात असणे आवश्यक आहे. अननुभवी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची मागणी सतत वाढत आहे. इंडियाफोरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीज या पुण्यातील संस्थेने केलेल्या पाहणी नुसार  येत्या तीन वर्षांत  हजारो फॉरेन्सिक अकाउंटंट्‌सची गरज आपल्याला भासणार आहे. 
सनदी लेखापाल (Chartered Accountant) जेव्हा हिशेबाच्या पुस्तकांचे परीक्षण करतो, तेव्हा अत्यंत वित्तीय गैरव्यवहार आढळल्यास त्याच्या मुळाशी जाणे ही त्याची जबाबदारी असते, आर्थिक घोटाळे शोधण्यासाठी जे  हिशेबाच्या पुस्तकांचे परीक्षण केले जाते त्याला फोरेन्सिक अकौन्टिन्ग म्हणले जाते. “फॉरेन्सिक अकाउंटंट’ आकड्यांचा पुढे जातो व लेखापरीक्षणाच्या कक्षेबाहेरील बाबींचा शोध घेतो.  फॉरेन्सिक अकौन्टिन्ग मध्ये हिशाबाचे दंडक व धोरणे यांवर कमी भर असतो; परंतु वित्तीय गैरव्यवहारांची कुठलीही शक्‍यता पडताळून ती उघड करण्याकडे संपूर्ण जोर असतो.
या क्षेत्राला भारतात दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. वित्तीय संस्था, बॅंका, विमा संस्था, रीटेल, टेलिकॉम अशा अनेक ठिकाणी फोरेन्सिक अकौन्टिन्ग मधील तज्ज्ञांची सध्या गरज भासत आहे. आज भारतातल्या प्रत्येक खाजगी बँकेमध्ये फ्रौड कंट्रोल नावाचा वेगळा विभाग आहे जो केवळ संशयास्पद व्यवहार, आर्थिक घोटाळे शोधणे आणि थांबवणे अशा पद्धतीची काम करतो, अनेक कंपन्यांमध्ये इंटर्नल ऑडीट विभाग पण फोरेन्सिक अकौन्टिन्ग चे काम करू लागले आहेत. पण असं असून पण भारतीय बँकांमध्ये गेल्या दहा वर्षात आर्थिक घोटाळे लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत, सप्टेंबर २००९ मध्ये रिझर्व बँकेने एक पत्रक काढून सर्व बँकांना खडे बोल सुनावले आहेत कि आता आर्थिक घोटाळे थांबवण्यासाठी फोरेन्सिक अकौन्टिन्ग मधल्या तज्ञांची मदत घ्यायला लागा. आत्ता पर्यंत चालू असलेले प्रयत्न जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध करायचा प्रयत्न करा. 
गैरव्यवहाराचा शोध व अटकाव अशा स्वरूपाचे हे क्षेत्र अत्यंत थरार असलेले आहे. यात प्रसंगी पोलिस खात्याची पण मदत घ्यावी लागते. पुराव्यांचा आधार घेत घेत गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्याची ही प्रक्रिया आहे. मनुष्य प्राणी जन्माला येत आहे तोवर नवीन नवीन घोटाळ्यांचा पद्धती जन्माला येताच राहणार आणि फोरेन्सिक अकौन्टन्ट्स ना काम हे मिळतच राहणार 
नेहमीच्या वाटा न चोखाळता स्वतःच्या अनुभवांची पायवाट करून आपले उद्दिष्ट गाठायचे असेल तर “फॉरेन्सिक अकाउंटिंग’चे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here