१० आदर्श व्यावसायिक जे त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत

20

कोरोनामुळे जेव्हा लॉक डाऊन जाहीर केला तेव्हा पासून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत होता. जीवनावश्यक वस्तूंना लॉक डाऊन मधून वगळण्यात आलं होतं पण त्यात शिक्षण क्षेत्राचा समावेश नव्हता. या घटनेमुळे अनेक लोकांनी खूप मजेदार गोष्टी शेयर केल्या. त्यातलेच एक होते  जर शिक्षण आवश्यकच नाही तर मग मी वयाच्या एकविसाव्या वर्ष पर्यंत काय करत होतो ? हे जरी मिम म्हणून समोर आले तरी हा खूप महत्वाचा प्रश्न होता. आज आपण ज्यांना यशस्वी म्हणतो असे मान्यवर आहेत ज्यांची शिक्षण पुरेशी नाहीत तरीही आज ते युवा पिढीचे आदर्श आहेत. अनेक महान उद्योजकांनी शाळेला किंवा शिक्षणाला रामराम ठोकून आपलं साम्राज्य उभं केलं. अशाच १० लोकांची नावं आज मी आपल्याला सांगणार आहे. . 

  1. बिल गेट्स – सर्रास आपण एक शिक्षण पूर्ण न केलेला आदर्श व्यावसायिक म्हणून ज्याचं नाव घेतो तो हा मायक्रोसॉफ्ट कम्पनीचा मालक. व्यवसायात असे पर्यंत जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता. 
  2. जॉन रॉकफेलर – १८७० मध्ये ज्याने स्टॅंडर्ड तेल कंपनीच्या माध्यमातून आपले तेल साम्राज्य निर्माण केले तो जॉन रॉकफेलर शालेय शिक्षण संपायचा दोन महिने आधीच शिक्षणाला रामराम केला. इतिहासातला पहिला अब्जाधीश अशी नोंद याच्या नावावर आहे.  
  3. वॉल्ट डिस्नी – आज डिस्नी कंपनी माहिती नसेल असा कोणीच छोटा मुलगा सापडणार नाही या जगात पण याचा प्रवर्तक वॉल्ट डिस्नी १६ व्या वर्षीच शाळेला रामराम ठोकून बाहेर पडला, त्याला आर्मी मध्ये जायच होतं पण तो लहान होता मग त्याने खोटा जन्म दाखला बनवून रेड क्रॉस मध्ये नोकरी मिळवलेली.
  4. रे क्रॉक – हा मॅकडोनाल्डचा संस्थापक नसला तरी आज मकडोनाल्डस हा ब्रँड मोठा करायचे श्रेय रे क्रॉक याच्याकडे जाते. वॉल्ट डिस्नी प्रमाणेच याला देखील आर्मी मध्ये जाऊन विश्व युद्ध लढायचे होते. याने देखील खोटा जन्म दाखला बनवला होता, वॉल डिस्नी आणि रे क्रॉक हे एकमेकांचे मित्र देखील होते. 
  5.  कर्नल सँडर्स – केंटुकी फ्राईड चिकनचा मालक असलेला सँडर्सचे वडील लहानपणीच गेले त्यामुळे तो कधी शाळेत गेलाच नाही, त्याच्यावर घरातल्यांचा स्वयंपाक करायची जबाबदारी होती आणि ती तो उत्तम निभावत असे
  6. मार्क झुकेरबर्ग – फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने आपल्या हार्वर्ड मधल्या शिक्षणाला रामराम ठोकलेला सर्वश्रुतच आहे.
  7. लॅरी एलिसन – आज आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी ओरॅकल हे नाव येतंच, पण याच ओरॅकल कंपनीचा मालक लॅरी एलिसन हा सलग दोन विद्यापीठातून शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडलेला आणि कधीच त्याच शिक्षण पूर्ण करू शकला नाही. 
  8.  स्टीव्ह जॉब्झ – ऍपल या जगप्रसिद्ध कंपनीचा हा सह-प्रवर्तक आणि नंतर सर्वेसर्वां. हा रीड कॉलेज मध्ये शिकत असताना याला अचानक असं जाणवल कि कॉलेज शिक्षणातून आपल्याला काहीच फायदा होणार नाही आहे आणि त्याने थेट कॉलेज सोडल. 
  9. रिचर्ड ब्रॅन्सन – वर्जिन अटलांटिक आणि वर्जिन मोबाईल या दोन कंपन्यांचा मालक हा देखील अधिकृत शिक्षण पूर्ण करू शकलेला नव्हता त्याने १६ व्या वर्षीच शाळा सोडली. 
  10. फ्रेडरिक रॉयस – रोल्स रॉयस या कंपनीचा मालक हा तर शालेय शिक्षण पण पूर्ण करू शकलेला नव्हता. 

तर अशी होती हि दहा यशस्वी उद्योजकांची गाथा जे कधी अधिकृत शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत पण याचा अर्थ असा नाही कि ते शिकले नाहीत, उलट ते आयुष्य भर विद्यार्थी बनून शिकत राहिले म्हणून ते यशस्वी झाले केवळ त्यांच्या कडे कोणत्याही शिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र नव्हते.